दीपक परुळेकर-फोन भूत !!!!--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:41:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दीपक परुळेकर"
                                   ----------------- 

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "दीपक परुळेकर" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "फोन भूत !!!!"

                                   फोन भूत !!!!--क्रमांक-१--
                                  -----------------------

     त्यावेळी मी आणि तेजस व्ही.एस्.एन्.एल्.मध्ये होतो. मला वाटतं गणपतीचे दिवस होते. आणि शनिवार होता. काम तसं फारसं नव्हतं. ऑफीसमध्ये आल्या आल्या तेजसने वर्दी दिली. " भाई, आज घरपे कोई नहीं है. रात को जश्न मनायेंगे."
त्यानुसार देव, जगदीश आणि अमेयला निमंत्रण गेलं. संध्याकाळी ७ वाजता तेजसच्या घरी जमायचं....आम्ही ४ - ५ वाजता ऑफीस सोडलं. मी तेजसला बोललो की मी घरी जातो आणि घरच्यांना तोंड दाखवून परत येतो. त्यावेळी मी घाटकोपरला राहायचो. मम्मीच्या समोर काही तरी पुडी सोडली आणि सटकलो. तिथुन बस स्टॉपवर आलो आणि ३०५ पकडली... आय थिंक ७ दिवसांचे गणपती गावी चालले होते.. त्यामुळे थोडं ट्रॅफीक होतं... मी सायनला पोहचलो असेन इतक्यात माझा सेल वाजला. नंबर अनोळखी होता..मी फोन उचलला." हॅलो... हॅलो..... " बोलतोय पण समोरुन फक्त ढोल ताश्यांचा किंवा मिरवणुकीचा आवाज येत होता पण व्यक्तीचा आवाज येत नव्हता... मी हॅलो हॅलो बोलुन वैतागलो आणि फोन डिसकनेक्ट केला... परत ५ मि. त्याच नंबरवरुन फोन आला. पुन्हा तेच !! मी हॅलो.. हॅलो ओरडतोय पण गोंगाटाशिवाय कसलाही आवाज नाही.... त्यात तो नंबरही ओळखीचा नव्हता....म्हणुन मी रिटर्न कॉल केला पण परत तोच आवाज आला.. दुसर्‍या वेळी माझा कॉल अ‍ॅन्सर नाही झाला. काही वेळाने तेजसचा फोन आला.. " कुठे आहेस रे? " त्याने विचारले.

    " अरे मी बसमध्ये आहे. सायनला पोह्चतोय. थोडा ट्रॅफीकमध्ये अडकलोय..."
गणपती विसर्जन असताना मी शिवाजी पार्कला जायला घाटकोपरहुन बस पकडली म्हणुन त्याने माझा उद्धार केला. मघाशी आलेले फोन कॉल कुणाचे असतील याचा विचार करत आणि गणपतींची मिरवणुक आणि मिरवणुकितल्या मुलींना बघत बघत मी अराउंड ७ - ७.३० वाजता पार्कात पोहचलो.तेजस आणि देव कट्ट्यावर स्टॉक घेउन बसले होते.. जग्गु, आणि अमेय अजुन आले नव्हते... आम्ही कट्ट्यावर तोपर्यंत पार्कातल्या पोरी बघत बसलो...बोलता बोलता मी तेजस आणि देवला मघाशी मला आलेल्या फोन कॉल्सबद्दल बोललो...दोघांना नंबरही दाखवला.. मी त्या नंबरच्या बाबतीत थोडा क्युरीअस होतो कारण एका वर्षापूर्वी माझं ब्रेक - अप झालं होतं. तरीही मी तिला विसरु शकलो नव्हतो... अजुनही नाही विसरु शकत्...त्यामुळे मला वाटत होतं की कदाचित तीच फोन करत असावी... कारण फोन आल्यावर मला बाकी सगळे आवाज येत होते फक्त त्या व्यक्तीचा आवाज येत नव्हता.. त्यामुळे मला असं वाटत होतं की ती मुद्दाम बोलत नसावी...पण कन्फर्म होत नव्हतं. मी ती शंका तेजस आणि देवला बोलुन दाखवली. साल्यांनी मला वेड्यात काढलं आणि मग आम्ही तेजसच्या घरी पोहचलो....काही वेळांनी सगळेजण पोहचले आणि मग मैफील सुरु झाली.. १ - २ पेग झाले असतिल.इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. बॉस लोकांचा उद्धार करुन झाला. एकमेकांची खेचुन झाली ( काय म्हणुन विचारु नका, आपण जाणकार आहात ) मग तेजसने सिगरेट फुकत त्याचा नेहमीचा शेर बोलुन दाखवला..
" अर्ज है ! "
" इर्शाद "
" के बेवफा सनमसे सिगरेट अच्छी है !"
" वा ! वा ! वा ! वा !"
" के बेवफा सनमसे सिगरेट अच्छी है, साली दिल जलाती है पर होठोंसे तो लगती है !"
" वा ! वा !! माश्या हलवा, माशा हलवा !!"

--दीपक परुळेकर 
(SUNDAY, NOVEMBER 1, 2009)
-----------------------------------

               (साभार आणि सौजन्य-दीपक परुळेकर.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              -------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.