दीपक परुळेकर-फोन भूत !!!!--क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:46:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दीपक परुळेकर"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "दीपक परुळेकर" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "फोन भूत !!!!"

                                   फोन भूत !!!!--क्रमांक-4--
                                  -----------------------

     मी बोललो, " हे बघा, माझ्याशे जे काही होतयं ते मला माहित नाही, पण जिथे प्रकाश आहे, जे आपण पाहु शकतो तेच सत्य आहे, जिथे प्रकाश संपतो तिथे अंधार सुरु होतो.. आणि ह्या अंधारात काय चाललयं हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपण तिथे प्रकाश टाकत नाही.... " ( डॅम्न ! काय खतरनाक डायलॉग होता ना ?? )
आतापर्यंत अमेय वैतागला होता, " ए साल्या आता जर गप्प बसला नाहिस ना तर डोक्यात बाटली घालेन, केव्हापासुन बडबड करतोय, कसली भुतं आणि आत्मा??? तु काय कुणा मुलीचा रेप करुन तीला मारुन टाकलयं? जी आता भुत बनुन तुला मारायला आलीय...आता जर गप्प झोपला नाहीस ना तर इथे एक आत्मा तयार करीन,.... तो तुझा !!"
( साला राक्षस !!! ) मी गप्प झालो. पण मला झोप येत नव्हती. मी घाबरलो होतो.. घाबरल्यामुळे आणि ती खिडकी दिसत असल्यामुळे माझी धडधड वाढली होती.. मला घाम फुटला होता...
मी अमेयला बोललो..." मला कसं तरी होतयं ... आय थिन्क माझा ब्लड प्रेशर ... अम्या साल्या मला हॉस्पिटलमध्ये घेउन चल... माझं काही खरं नाही..."
सगळेजण मला शांत करत होते पण मी कुणाचच एऐकत नव्हतो..
शेवटी अमेय उठला... " साला, हा काय झोपायला देणार नाही....मरु दे रे, देव सांग त्याला कुठुन फोन येतायत ते,, दाखव त्याला भूत...."
मी शांत....

     " काय? काय " कोण फोन करतो???'" मी देवकडे पाहिले, तो हसत होता... मला बोलला... "सेल स्विच ऑन कर."
मी पटकन सेल स्विच ऑन केला...आणि त्या नंबरवरुन फोन आला... मे देवकडे पाहिले त्याचा सेल त्याच्या हातात होता पण त्याचा नंबरवरुन कॉल येत नव्हता.. सगळ्यांचे फोन सगळ्यांकडे होते... पण कुणाच्याच सेलवरुन फोन येत नव्हता.....
"काय चाललयं ? कुणी सांगेल का???"
अमेयने एक टपली मारली " आरे साल्या इथुन फोन येतोय तुला." आणि देवने खिशातुन दुअसरा सेल बाहेर काढला..!!
डॅम्न!! जेव्हा मला हा सगळा प्रकार कळला तेव्हा माझा चेहरा बघण्यालायक झाला होता.. सगळेजण माझ्यावर हसत होते...माझी खेचत होते....जर हा सगळा प्रकार तेव्हा रेकॉर्ड केला असता तर एम टीव्ही बकरावर फर्स्ट प्राईझ मिळालं असतं.... खतरनाक एपिसोड झाल होता.. मी ही नंतर हसायला लIगलो.....

     त्याचं झालं असं, देवकडे दोन सेल फोन होते. एक आय थिंक रिलायंसचा आणि एक गरूडा... पैकी रिलIयन्सचा नंबर माझ्याकडे होता पण गरुडाचा नव्हता..त्यावेळी गरुडाची स्कीम होती कि महिना १२०० रु. फिक्स्ड भरायचे अणि कोणत्याही लोकल नंबरवर अनलिमिटेड बोलायचे....तोच फोन त्याच्याकडे होता...संध्याकाळी मी जेव्हा बसमध्ये होतो तेव्हा देव मला फोन करत होता पण काही प्रॉब्लेम्समुळे मला त्याचा आवाज येत नव्हता. फक्त तो गोंगाट ऐकु येत होता...मी जेव्हा त्यांना पार्कात भेटलो आणि त्या कॉल्सबद्दल सांगितले साल्यांनी तेव्हाच ठरवले की आज ह्याल घ्यायचं...त्याप्रमणे त्यांनी बाकिच्यांनापण सांगुन ठेवले होते....पीताना देव हळुच खिशात हात घालायचा आणि माझा नंबर डायल कारायचा.. मी फोन उचलल्यावर हरामखोर सगळे शांत व्हायचे...जेव्हा मी बोललो की अरे यार आपण जे बोलतोय तेच मला ऐकु येतेयं तेव्हाच मला समजायला हवं होतं की इथुनच कुणी तरी फोन करतयं. पण अ‍ॅल्कोहोल डोक्यात चढल्यावर डोकं थोडंच काम करणार !! असो...शेवटी क्लायमॅक्स ! व्हिस्परिंग साउंड !!!! देव बाथरुममध्ये गेला आणि तिथुन त्याने फोन केला होता.. दारु पिताना नॉरमली सगळेजण सारखे सारखे टॉयलेटला जात असतात त्यामुळे माझं त्याच्याजडे लक्ष नव्हतं. प्लस त्याचा फोन माझ्यासमोरच होता...आणि साले सगळेजण इतकी क्लास अ‍ॅक्टींग करत होते की मला जरासुद्धा शंका आली नव्हती... डॅम्न!! त्यानंतर हा प्रकार सगळ्या मित्रांना कळवण्यात आला.. आणि मला सग्ळे फोन करुन व्हिस्परिंग आवाजात बोलायाच !" दी....पप्प्प्क... यु आर डेड !! " सगळ्यांची हसुन हसुन पुरेवाट लागली.... आजही तो किस्सा आठवला की मला स्वत:वरच हसायला येतं!!! असतात एक एक त्यापैकी मी एक !!!

--दीपक परुळेकर 
(SUNDAY, NOVEMBER 1, 2009)
-----------------------------------

              (साभार आणि सौजन्य-दीपक परुळेकर.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
             --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.