माझ्या आठवणी-सूरपूजा

Started by Atul Kaviraje, September 15, 2022, 09:24:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "माझ्या आठवणी"
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "माझ्या आठवणी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "सूरपूजा"

                                             सूरपूजा--
                                            -------

     कोल्हापुरच्या अंबाबाईचे देउळ, संध्याकाळची साधारण चार साडेचार ची वेळ. मी तेव्हा कोल्हापुरला शिकायला होते दोन वर्षे. मी आणि अंजु काहीतरी खरेदीसाठी विद्यापिठातुन लक्ष्मीपुरीमधे आलेलो. सिटीबस मधुन उतरल्यावर देवीला नमस्कार करुन मग बाकीच्या कामाला जायचे ही सवय ठरलेली होती. त्याप्रमाणे मी आणि अंजु अंबाबाईच्या समोरच्या बाजुला जो गणपती आहे त्याचे दर्शन घेउन देवीच्या गाभार्याकडे गेलो. जाता जाता मी अंजुला म्हणाले कोणीतरी गातेय बघ. तिच्या ही गोष्ट लक्षात यायला बराच वेळ लागला. देवीला नमस्कार केला. देवळात फारच कमी गर्दी होती, अजीबात नव्हतीच म्हणा ना!

     पुढे जाउन गाभार्यात डोकावुन पाहिले तर आत कोणीतरी सोवळे नेसुन गात होते. मग अम्ही तिथेच गाणे ऐकत बसुन राहीलो. साधारण १५ मिनिटे गेली आणि गायन थांबले. कोणता राग होता, वगैरे मला काही समजले नाही, अजुनही समजत नाही! पण ऎकयला अतीशय सुंदर वाटले. मग गायक देवीला नमस्कार करुन बाहेर आले - पहाते तर पंडीत जसराज! डोळ्यावर विश्वास बसेना. परत एकदा खात्री करुन घेतली मनाशी की तेच आहेत. सोवळे नेसलेले, साधे नम्र भाव असलेले पंडीतजी एकदम फ़ार जवळचे वाटले. पण त्याक्षणाला त्यांची स्वIक्षरी घ्यावी असे अजिबात वाटले नाही. ते दृश्य डोळ्यात साठवुन आम्ही आमच्या कामासाठी निघुन गेलो.

     त्यानंतर मी जेव्हा जेव्हा देवळात जाते, तेव्हा तेव्हा पंडीतजीनी बांधलेली सुरपूजा कायम मनात झंकारते आणि तो क्षण मी मनातल्या मनात परत जगते.

--मिन्ट्स !
(Wednesday, December 14, 2005)
--------------------------------------

                (साभार आणि सौजन्य-माझ्या आठवणी.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               -------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2022-गुरुवार.