अंधार

Started by amoul, July 26, 2010, 01:54:14 PM

Previous topic - Next topic

amoul

कधी कधी आपल्या जणांमध्ये असतांना आपल्या यशामुळे असे वाटतेकी आपण त्यांच्यापासून दूर जात आहोत, त्या दूर न जाऊ पाहणाऱ्या संवेदनशील मनाची कविता.

मी ठरवलंय आता मला अंधारातच रहायचय................
उजेडात येऊन दुसरया कुणावर पडणारा उजेड का अडवावा ?..
त्यापेक्षा अंधार बरा म्हणजे सावल्यांचा त्रास नाही.......नि ..... भासही नाही.....

अंधार हा वाईट नसतोच मुळात....
त्यामुळेच तर उजेडाच महत्व टिकून आहे.

मी आता सिगारेटही पेटवत नाही कारण.....
त्यासाठीसुद्धा काडी पेटवावी लागते,
नि ती पेटतांना पडणाऱ्या उजेडामुळे मला पुन्हा माझ्या सावल्या दिसू लागतात.....

मी त्या चिंगारीच्याही  उजेडापासून दूर आहे पण सुखी आहे......
तुम्हा सर्वांना उजेडाच्या शुभेच्छा .....

.................अमोल

gaurig


sanika

Hi Amol,
Chan ahe kavita, pan ek sangavese watate. Andhar asla ter ek tari ujedachi kiran tyamagun apsuk chalat yete.