कोण नसते कोणाचे

Started by chetan (टाकाऊ), July 26, 2010, 02:51:05 PM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

1)कोण नसते कोणाचे
ढग  नसतात आकाशाचे   
थेंब नसतात त्या सरींचे
अश्रू नसतात डोळ्यांचे
समुद्र नसतो किना-याचा
स्वार्थ असतो सगळ्यांचा....
तरी ठाम असते जवळ येणे सा-यांचे.........




2)


कोण नसते कोणाचे
ढग  नसतात आकाशाचे   
थेंब नसतात त्या सरींचे
अश्रू नसतात डोळ्यांचे
आपलेच डोळे आपणच पुसायचे
जीवनाचे पुस्तक परत एकदा उघडायचे
त्यात मग डोकावून पाहायचे
सुख दुखांचे क्षण आठवायचे
आणि हसत हसत मृतुच्या दारी येऊन बसायचे .

३) कोण नसते  कोणाचे ,
ढग  नसतात आकाशाचे   
थेंब नसतात त्या सरींचे
अश्रू नसतात डोळ्यांचे
तरीही अपुरे आहोत  दोघे हि
जसे क्षण तुझ्या माझ्या प्रेमाचे ..
चेतन र राजगुरु .