मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-68

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:38:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-68
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकाराने  मानवी  स्वभावाचा  एक  कंगोरा  प्रस्तुत  चारोळीतून  सांगितला  आहे . तो  सांगतोय , मी  माझ्या  जीवनात  अनेक  व्यक्तींना  भेटलो , अनेक  वल्लीनI  भेटलो , अनेक  विक्षिप्त  माणसांशी  माझा  परिचय  झाला . त्यांच्या  स्वभावाचे  अनेक  पैलू  मला  यातून  कळले . प्रत्येक  माणूस  वेगळा , आणि  त्याप्रमाणे  त्याचा  स्वभावही  वेगळा . अशी  कितीतरी  विभिन्न , भिन्न-भिन्न  व्यक्तिरेखा  माझ्या  जीवनात  आल्या .

     पुढे  हा  चारोळीकार  म्हणतोय , ज्या  ज्या  व्यक्ती  मला  भेटल्या , जी  माणसे  मला  मिळाली , त्यांच्या  विषयी  मी  काय  सांगावे  बरे  ? त्यांना  मी  चांगलंच  पारखून  घेतलं  होतं . त्यांचा  भला-बुरा  स्वभाव  मी  चांगलाच  ओळखून  होतो . त्यांची  वर्तणूक , वागणूक  याबद्दल  मी  भर-भरूनही  बोलू  शकेन . त्यांच्याविषयी  मी  बोलताना  मुळीच  अडखळणार  नाही . कारण  मला  त्यांचा  स्वभाव  महिताहे . त्यांना  मी  चांगलाच  ओळखून  आहे .

     पण  पुढे  जाऊन  हाच  चारोळीकार  कबूल  करतोय , की  हे  जरी  खरं  असलं , तरी  मी  मला स्वतःला  अजुनी  पूर्णपणे  जाणू  शकलेलो  नाही . माझा  स्वभाव  नीट  मलाच   ज्ञात  नाही , मी  कसा  वागतो , मी  कसं  वर्तन  करतो , हे  मला  अजुनी  मी  म्हणून  माहित  नाही . मला  जर  कुणी  माझ्या  स्वतःबद्दल  बोलायला  सांगितलं , तर  मला  एकही  शब्द  मात्र  सुचणार  नाही . कारण  मीच  मला  स्वतःला  पूर्णपणे  ओळखू  शकलेलो  नाहीय . दुसऱ्यांविषयी  मी  मारे  बोलेन , पण  माझ्या  स्वतःबद्दल  काय  ? ते  तर  अगदीच  अशक्य  आहे . म्हणजेच , आता  मला  कळलंय , की  मी  जेव्हा  दुसऱ्याबद्दल  बोलतो , त्यांचे  उणे-अधिक  काढतो , त्यांच्यात  खोटं  काढतो , तेव्हा  त्याच  वेळी  मी  स्वतःला  विसरलेला  असतो . माझ्यातील  उणिवा , दोष , कमीपणा , मला  स्वतःहून  कधीच  कळत  नाही . मी  जेव्हा  दुसऱ्यांकडे  एक  बोट  दाखवतो , रोखतो , तेव्हा  माझी  उरलेली  चारही  बोटे  ही  माझ्याचकडे  वळलेली  असतात , ती  माझेच  गुण-दोष  मला  दाखवीत  असतात , आणि  हे  मला  कधीच  कळून  येत  नाही .

=============
दुसऱ्याविषयी बोलतांना
शब्द आठवावे लागत नाही
अन स्वतःविषयी बोलतांना
मग शब्द सुचत नाही.
=============

--नवं-चारोळीकार
----------------

                       (साभार आणि सौजन्य-मराठी विचार.कॉम)
                      -------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.