कविता पावसाच्या-कविता-अठ्ठावन्नावी-आवडता पाऊस

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:42:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "कविता पावसाच्या"
                                    कविता-अठ्ठावन्नावी 
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस यावर्षी अगदी सुरुवातीलाच मनसोक्त बरसला आणि या पावसाला साजेशा कविताही कविमनातून उत्स्फूर्तपणे प्रगटल्या. प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस यावर्षी अगदी सुरुवातीलाच मनसोक्त बरसला आणि या पावसाला साजेशा कविताही कविमनातून उत्स्फूर्तपणे प्रगटल्या. महाराष्ट्राला सुखावणा-या या पावसावर दै. 'प्रहार'ने 'बालकवी' पुरस्कारासाठी कवींना 'पाऊस' या विषयावर कविता पाठवण्याची एक अनोखी संधी दिली आहे. पावसावरील अशाच काही निवडक कविता आम्ही आपणा वाचकांसाठी क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

                                    "आवडता पाऊस"
                                   -----------------

मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस..
कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस..
हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस..
लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा तो पाऊस !!

कधी धो-धो तर कधी रिमझिम पडणारा तो पाऊस..
स्वप्नांच्या गावात घेऊन जाणारा तो पाऊस..
तुझ्या माझ्या आठवणीत रमणारा तो पाऊस..
चिंब-चिंब भिजवून हरवून टाकणारा तो पाऊस !!

अबोल असला तरी खूप काही बोलून जाणारा तो पाऊस..
मातीला भिजवून सुगंध देऊन जाणारा तो पाऊस..
भान हरवून टाकणारा तो पाऊस..
हवा-हवासा वाटणारा तो पाऊस !!

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-प्रहार.इन)
                       -----------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.