प्रसिक-स्पंदन-1--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:32:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "प्रसिक"
                                       ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "प्रसिक" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्पंदन-1"
                                                     
                                        स्पंदन-1--क्रमांक-१--
                                       ------------------

     जे.एस्.एम्. कॉलेज मधे तुमचे स्वागत आहे. या कॉलेजमधे तुम्हाला हुशार, खेळाडू, पराक्रमी, बोअर करणारे, एकटे राहणारे आणि रोमीओचा वारसा चालवणारे असे सर्वप्रकारचे विद्यार्थी आढळतील. यामधील काहीजण कारमधुन, काही बाईकवर, काही दाडींयात्रा करत पैदल, काही ट्रेन चे धक्के खात तर काही बसमधुन येतात.
याच कॉलेजमधे निकीता देसाई ऊर्फ निकी देखिल शिकते, एकोणीस वर्षाची, स्मार्ट, सुदंर मुलगी पण तीच्या सुदंरतेची तारिफ करायला कॉलेजमधील कोणीही धजावत नाही.
आज सकाळची वेळ आहे आणि निकी नेहमीप्रमाणे तीच्या बाईकवरून ऊतरते. Actually ती बाईक मुलीऐवजी एखाद्या मुलालाच जास्त शोभेल. पण निकी मात्र त्याला अपवाद आहे. ब्लॅक जॅकेट, ब्ल्यु जिन्स, हातात तीन बूक्स, काही पेन्स वैगेरे. नेहमीच्या पेहरावात स्वारी क्लासकडे चालली आहे, तेवढ्यात एक ज्युनीअर मुलगा हॉलीबॉलच्या नादात निकीला धक्का देतो. तो मुलगा मदत करायला जाणार, पण कोणाला धडक मारली आहे हे बघूनच तो......
"हे.... सॉरी"
तो घाबरतच तीच्या पडलेल्या वस्तू उचलायला लागतो.
"पळ इथुन", निकी म्हणते.
तरिही तो पडलेल्या वस्तू उचलत बसतो.
"सांगितले ना, पळ इथुन." निकीचा मुड खराब झालाय.
निकी त्याचा हॉलीबॉल घेऊन झटकन त्याच्या समोर आणते जणूकाही त्याच्या चेहय्राचा हॉलीबॉल करण्याच्या विचारात आहे. तो बिचारा गपचूप आपला बॉल घेतो, आणि ती त्याला जाऊ देते. जसजशी ती क्लासकडे जाते ईतर स्टुडंटसच्या नजरा तीचा पाठलाग करतात. दरवाजाला एक जोरदार धक्का देऊन ती क्लासमधे प्रवेश करते.

     याच कॉलेजमधे अनुष्का देसाई नावाची परी देखिल शिकते, निकीताची छोटी बहीण. ती आणि तीची मैत्रिण पिया जास्त वेळ गर्ल्स-रूमच्या आरश्यासमोर घालवणे पसंत करतात. आता देखिल त्या आरश्यासमोरच आहेत.
बराचवेळ तिथे गेल्यानतंर क्लासची आठवण येते. गर्ल्स रूमच्या बाहेर येताच गर्दी अनुष्काला 'हाय, हॅलो' करायला लागते. त्या गर्दीत मुलांच्या सोबत मुली देखिल आहेत.
"हाय अनुष्का" ,एक मुलगा म्हणतो.
"ड्रेस छान आहे", गर्दीतील एक मुलगी म्हणते.
तर कोणी लिपस्टीक ची तारिफ करते.
हाय, हॅलो चा सिलसीला चालू राहतो, फक्त अनुष्कासाठी, पियाकडे कोणाचेच लक्ष नाही. खुपजण अनुष्का सोबत जवळीक् साधायचा प्रयत्न करतात. अनुष्का तीच्या फॅन्सकडे बघून स्माईल फेकत क्लासकडे जाते.

     प्रशांत साठे, एक हॅन्डसम, सरळमार्गी सिनिअर आणखी एका स्टुडन्ट सोबत, कॉलेजमधील गाईडन्स काउन्सलर, कुलकर्णी मॅडम समोर बसला आहे,
"मला वाटतं कि हे कॉलेज तुझ्या जुन्या कॉलेजपेक्षा काही वेगळे नसेल, घर सोडून ईथे टाईमपास करणारे मुलं खुप आहेत", या वाक्यासोबत एक क्रूत्रीम हस्य तीच्या चेहय्रावर बघुन प्रशांतला त्या खुर्चीत बसुन अस्वस्थ वाटायला लागते.
"Any questions?" मॅडम विचारतात.
"नाही मॅडम, काही नाही," प्रशांत म्हणतो.
"तर मग क्लास मधे जा, लवकर, मला आजच्या उद्योगी मुलांचे उद्योग बघायचे आहेत", मॅडम म्हणतात.

--प्रसिक
(मंगळवार, १३ फेब्रुवारी, २००७)
----------------------------

                   (साभार आणि सौजन्य-प्रसिक.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.