प्रसिक-स्पंदन-1--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:33:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "प्रसिक"
                                       ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "प्रसिक" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्पंदन-1"
                                                     
                                        स्पंदन-1--क्रमांक-2--
                                       -------------------

     प्रशांत जाण्यासाठी उठतो तोच, राकेश शहा, एव्हरेज सिनीअर पेक्षा जास्त वय असणाय्रा मुलाशी त्याची नजरानजर होते, तो कुलकर्णी मॅडमच्या ऑफिसबाहेर कशाचीतरी वाट पाहतोय. त्याचे शरिर आणि स्माईल पाहूनच अदांज येतो कि तो किती 'कुल' असेल.
कुलकर्णी मॅडम हातातल्या रिपोर्ट-फाईलकडे बघतात नतंर राकेशकडे," राकेश शहा, मला वाटते आपली भेट वारंवार व्हायला लागली आहे"
"मला नेहमी तुमची आठवण येते", राकेश म्हणतो.
"मला एकिवात आले आहे तु कॅन्टीन मधे फ्रेशर गर्ल्स समोर कपडे काढुन मसल्स दाखवत होतास."
"माझ्या कपड्यांवर सॉस पडलं होतं, लन्च करताना."
"लन्च हं? तुम्ही टिश्युपेपर एवजी शर्ट कपडे कधीपासून वापरायला लागलात?"

     प्रशांतला तिथे थांबण्यात काहिच अर्थ वाटत नाही, दरवाजाबाहेर येतो आणि त्याची गाठ मनिष लाड -एक सडपातळ, हुशार सिनीअरशी पडते. कॉलेजमधे सर्वांचें मत आहे कि मनिष एखादा नेता, किवां एखादा शो होस्ट बनेल.
"तु नविन आहेस ना?" मनिष विचारतो.
"मलापण असेच वाटते", प्रशांत म्हणतो.
"ठिक आहे, चल मी तुला कॉलेज दाखवतो", मनिष म्हणतो
ऑफिसच्या कॅरिडोर मधुन ते बाहेर पडतात.
"तर, तु आगोदर कुठल्या जंगलात रहात होतास" मनिष विचारतो.
"मी, आगोदर कोल्हापुर मधे होतो. पण तु...?"
"It was a joke. पण तीथे खरोखर माणसं रहातात?"
"हा, थोडीफार. पण माणसांपेक्षा गाई जास्त आहेत."
"तुझ्या जुन्या कॉलेजमधे किती माणसे होती?"
"बत्तीस"
"ए जा ना!"
"ईथे किती असतील?"
"हजार! त्यातील बहुतेक शैतान आहेत", मनिष म्हणतो.

     "ईथे काही Good Looking लोक आहेत्, तु जोपर्यंत सुरवात करत नाहीस तो पर्यंत ते तुझ्याशी बोलणार नाहीत, लाजू नकोस!"
त्यांच्या बाजुने एक सुदंर मुलीचां ग्रुप जातो.
"तो स्पोर्ट्स टिमचा ग्रुप आहे." टिशर्ट, स्पोर्ट्स शुज घातलेला एक ग्रुप स्वःतातच मशगुल आहे.
"मी देखिल टिममधे होतो" ,प्रशांत म्हणतो.
"हा, पण त्यानीं अजुन कधीच कुठली मॅच जिंकली नाही, यावर्षी त्याचीं दुसरे काहीतरी करण्याची ईच्छा आहे."
जसजसे ते पुढे जातात, त्यानां कॅन्टीन जवळ एक ग्रुप दिसतो.
"हा फुकट्या मुलांचा ग्रुप, त्याच्यांसोबत जरा सांभाळूनच रहा."

     ते कॉलेज बिल्डींगच्या बाहेर येतात.
मनिष प्रशांतला College-Trip करवत आहे. अजुन काही ग्रुपची ओळख करून देतो. एका घाबरट मुलाकडे, ईशाराकरून मनिष ओरडतो, " अरे संयोग, लन्चसाठी पण काही ठेऊन दे.... माझा भाऊ आहे, एकदम शातं."
कॅन्टीनकडे जाताना प्रशांत मनिषला विचारतो, "तु या सर्वांमधे कुठे फिट बसतोस?"
ते कॅन्टीनमधे प्रवेश करतात. कॅन्टीनमधे म्युझीकच्या आवाजा सोबत गर्दी देखिल आहे.
"भविष्यातला बिजनेसमेन. माझ्यासारखे अजुनही काही आहेत. एकेदिवशी मी मॅनेजर असेन आणि त्यावेळेस हि सर्व मुलं...."
तो टेबलाच्या बाजुला घोळका करून बसलेल्या मुलांकडे ईशारा करत म्हणतो, "मला साहेब म्हणतील. & There he is, अनिल, माझा मित्र आहे."
प्रशांतला काहिच एकायला येत नाही, कारण अनुष्का त्याच्या बाजुने जाते, तसं प्रशांत आणि मनिषकडे ती एकदाही पहात नाही. पण प्रशांत मात्र वेड्यासारखा तीच्याकडे पहात रहातो.
"ती मुलगी... मी..." प्रशांत बडबडायला लागलाय.
"झाले, हा पण हारवला." मनिष म्हणतो.
"ती कोण आहे?"
"अनुष्का देसाई. तीच्याबद्दल विचार सोडून दे."
"का?"
"का?...... राजा मला तुझ्या हेअरकट पासुन सुरवात करायला लागेल, पण त्याचा देखिल काहीच उपयोग नाही. तीची मोठी बहिण कॉलेजमधे आहे, तो पर्यंत तरी नाही."
(क्रमशः)

--प्रसिक
(मंगळवार, १३ फेब्रुवारी, २००७)
----------------------------

                     (साभार आणि सौजन्य-प्रसिक.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    -----------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.