मन-मोकळे-माता न तू वैरिणी

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:20:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "मन-मोकळे"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मन-मोकळे" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "माता न तू वैरिणी"

                                        माता न तू वैरिणी--
                                       ---------------   
                                       
     आज मुक्तापीठ पुरवणी मधे "माता न तू वैरिणी" या नावाचा लेख वाचला.त्यातली नेहाची व्यथा ही थोड्या फार प्रमाणात आजकालच्या सगळ्याच नविन मुलामुलींची व्यथा आहे.इथे ती नविन लग्न करुन सासरी गेलिये पण तिच्या आई च्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये.वीकेंड ला एक दिवस तिने आपल्या सोबत घालवावा अस तिच्या आई ला वाटत. तर आठ दिवसातून मिळालेली दोन दिवसांची सुट्टी तिने आपल्याच सोबत घालवावी अस त्याला वाटत आहे.लेखात नसलेली एक बाजु माला अशी वाटते की थोड्या फार प्रमाणात सासु च्या ही अशाच कही अपेक्षा असतील की तिने हे दोन दिवस घरात लक्ष द्याव.माला जरा मोकला वेळ मिळावा.माला अस वाटत की यात खर तर कोणीच चुकत नाहीये.नेहाच्या आई ने जर सार आयुष्य नेहाच्या भोवती तिला समृद्ध करण्या साठी घालवल असेल तर आता त्याना खुप एकट वाटत असणार.म्हणून त्या थोड्या सैरभैर झाल्या असणार.एकटे पडण्याच्या भीतीने त्या तसा वैताग व्यक्त करत असतील.थोड नेहानी त्याना प्रेमाने समजवन्याची व त्यानी पण थोड समजुन घेण्याची गरज आहे.

     आज काल मुलांच्या बरोबरीने मुली घराबाहेर पडून प्रसंगी शिफ्ट मधे कम करत आहेत.आपल घरकुल जास्तीत जास्त सुरक्षित,जास्तीत जास्त सुखासोयिनी समृद्ध करण्या साठी जिवापाड महेनत करत आहेत.तिथे त्यांच्या कामा मधे कुठे ही एक स्त्री म्हणून कोणतीही सवलत त्याना मिळत नाही.आय.टी.इंडस्ट्री मधे तितक्याच तनावा खाली या मुली काम करत असतात.मुलां इतकाच पगार कमावत असतात.पण घरी आल्यावर सुद्धा त्यांची कोणती न कोणती ड्यूटी चालूच असते.बायकोची,आईची,सुनेची,वहिनीची!प्रत्येकांच्या अपेक्षा अगदी हसतमुख पणे तिने पूर्ण कराव्यात अस प्रत्येकालाच वाटत रहत.पण तिच्या के अपेक्षा आहेत?हा विचार कोणीच करत नाही.आता कोणाच्या अपेक्षा पण चुकीच्या नाहीत,तिने घराबाहेर पडून काम करण ही चुकिच नाही.मग चुकते कुठे?आपण मध्यंतरी आय.टी.मधल्या कितीतरी मुलांनी आत्महत्या केल्याच पेपर मधे वाचले आहे.करण काय तर वाढता ताण-तणाव! मग कामाच्या ठिकानाचा ताण,घरचा ताण,शारीरिक त्रास हे सगळ सहन करुन या मुली परत जिद्दीने उभ्या रहातच आहेत.तेव्हा आजकालच्या आयांनी हो अयाच म्हणते मी करण सासुनी सुद्धा आईची जागा घेउन हा विचार करावा आणि आपल्या मुलींना,सुनांना समजून घेउन त्यांच्या पंखात बळ द्याव.त्याना घरी तरी मुक्त जगता येइल अस वातावरण तयार काराव !या पेक्षा अजुन काय सांगू ?नक्की विचार कराच !

--मन-मोकळे
(MONDAY, FEBRUARY 22, 2010)
------------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-मन-मोकळे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.