माझं विश्व …माझ्या शब्दात !!-महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:30:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "माझं विश्व ...माझ्या शब्दात !!"
                            ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "माझं विश्व ...माझ्या शब्दात !!" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती"

                 महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती--क्रमांक-3--
                ------------------------------------------

     गौरी गणपती झाल्यावर येते कोजागिरी.  दरवर्षी या पौर्णिमेच्या चांदण्यात मंडळाची सहल असते पण काहीतरी नवीन हवं ना......!  म्हणून आम्ही एक आगळावेगळा कार्यक्रम करायचं ठरवलं.  धमाकेदार दांडीयासोबत काही जबरदस्त स्पर्धा. मस्त response मिळाला सगळ्यांकडून.  ह्या कार्यक्रमाच सूत्रसंचालन मी आणि उत्साही कलाकार मिलिंद देशमुख ह्यांनी केलं.  हसतखेळत झालेल्या आणि तुफ़ान प्रतिसाद मिळालेल्या स्पर्धांमधे पहिली स्पर्धा होती "आम्ही दोघं राजाराणी".   ह्यात भाग घेतलेल्या राजांना अंतरपाआटाच्या एका बाजूला तर राण्यांना दुसऱ्या बाजूला उभं करण्यात आलं.  सगळ्यांना प्रश्नावल्या देण्यात आल्या.  त्या सोडवायला त्यांना वेळ होता मंगलाष्टकं संपेपर्यंत.  ही टिंगलाष्टकं रचली होती मी आणि गायली होती मी आणि विवेकनी.

                  मंगलाष्टकं--

आता सावध सावधान घटीका, संपूर्ण आली भरून
राजा राणी कशी समोर बसती, हाती पेन धरुन ॥

प्रश्नांच्या झडती कशा नौबती, चिंता कशाचीपरी
अर्धांगी असूनी सखी तू मनी, राजा तुझ्या अंतरी
होती वाद जरी सदा तुजसवे, प्रीती मनी तुजवरी
गोडी त्या वादातही मज मिळे, प्रीती तुझी आगळी ॥

नाही ठाऊक कोण बॉस त्याचा, सदनी असे बॉस तो
त्याचा शब्द सदैव मी उचलते, पदरी किती त्रास तो
नाही काही इलाज आज उरला, गतजन्मीचे फ़ेडणे
नवरा हा मजलाच का लाभला, नशिबीच हे भोगणे ॥

भांडे राणी जरी घरी कचकचा, राजासवे कितीतरी
सांभाळे राजास ती परिणीता, दोषी किती तो जरी
राणी ती करते वसूल सगळे, व्याजासवे झडकरी
पुरवूनी त्या मागण्या नवनव्या, राजाच हफ़्ते भरी ॥

घरची सारी खुषी तुझ्यावर परी, जेव्हा तू येतो घरी
दुनियेचा सगळाच राग निघतो, माझ्यावरी का परी
मित्राच्या पत्नीवरीच मग का, असते फ़िदा ही स्वारी
पदरी ध्यान गजानना तू दिधले, आता निभावू कशी ॥

कामे आटपूनी कशी पसरते, राणी बिछान्यावरी
राजा येई घरी परतूनी, राणी असे फ़ोनवरी
थकलेल्या राजास जेवण मिळे, ते थंड बर्फ़ापरी
म्हणूनी त्या राजास नित्य वाटे, मित्राची पत्नी बरी ॥

गुरुवारी मज वाटते कधी हवी, स्वैपाकास सुटी
पण राजा म्हणतो सदैवच बरा, स्वैपाक तो घरगुती
फ़र्माईश करील तोच मजसी, कर तू घरी भाकरी
राजा हा असतोच मालक सदा, राणी करे नोकरी ॥

वाचूनी हे प्रश्न आज सगळे, कळले तया जीवनी
नव्हती ती जाणीव कशी मज परी, माझीच ती स्वामिनी
विसरुया मतभेद आज अपुले, कर घेऊनी हे करी
मिळूनी ही करु वाटचाल पुढची, बनूनी सखे सोबती ॥

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(कुवेत, ऑगस्ट 23, 2006)
-------------------------

                 (साभार आणि सौजन्य-आशा ब्लॉग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.