पालवी-स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:44:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "पालवी"
                                       ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी यांच्या "पालवी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य"

                            स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-3--
                           -------------------------------

     याला जबाबदार कोण? यावर उपाय काय? हे कुठे थांबेल?....अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यास व योग्य ती पाऊले उचलण्याची खरंच गरज आहे. आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांचे पुरुषी वागणे ,बोलणे, नको तितके "फ़्री" वागणे ,मुलांशी अतिजवळीक मैत्री,उत्तान कपडे ,फ़ॅशन, तसेच टी.व्ही.-सिनेमात नको ती दृष्ये ,हावभाव ,अंगविक्षेप क्लोजअपने दाखवणे . आता तर रिमेक्सच्या नावाखाली घालत असलेला धागडधिंगा तर आपण रोजच विविध चॅनेल्सवर बघतच आहोत. हे देखिल तितकेच कारणीभूत ठरत आहे. कारण जेव्हां टी.व्ही. हे माध्यम नव्हते, तेंव्हा  जुन्या सिनेमातुन अशी दृश्ये दाखवली जात नसत.तेंव्हा हे प्रमाण खुपच कमी होते. त्यावेळी अशी प्रेमविषयक भाषा बोलण्यास तरुण मुले सुद्धा धजावत नसत. आज मात्र सर्रास चर्चा होताना दिसतात.याला कारण म्हणजे या स्त्रियांना नको तितके मिळालेले स्वातंत्र्य. आज पालकांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लाड म्हणुन त्यांना डोक्यावर बसवायचे तेवढे ठेवले आहे. आपली मुलगी काय कपडे घालती आहे, संगत तिची कशी आहे? तिचे अभ्यासाव्यतिरिक्त अन्य कलागुणांकडे लक्ष्य आहे का? का तिचे काही इतर ही उद्योग चालतात,—याकडे प्रत्येक माता-पित्यांनी लक्ष द्यायला हवे. कारण अतिरिक्त सूट ही देखिल नाशास कारणीभूत ठरते. आपल्या मुलींना "नाही ऐकायची" सवय सुद्धा असायला हवी.नाही नाही ते लाड पुरवताना तिला आपण दरीत ढकलत असतो. स्त्रीला स्वातंत्र्य असे हवे,की ताठ मानेने ती ते निभावू शकेल. बदनामी, खोटेपणा यांच्या वा-याला ही न उभे राहता, स्वतंत्रपणे निर्णय घेणे व त्या बद्दल आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याच बरोबर घरातील अन्य व्यक्तिंचा तिच्यावर विश्वास व साथ असेल तर ती स्त्री यशाचे अनेक मार्ग यशस्वीपणे  पादाक्रांत करु शकते.

     आज ही देशाच्या काही भागात बाल विवाह, सती-प्रथा अशा घटना घडत आहेत.पैशासाठी मुलींना विकले जाते, गर्भात मुलगी असेल तर तिला जन्मापूर्वीच संपवले जाते, काही ठिकाणी हुंड्यासाठी स्त्रीचा बळी जातो, तिची मारहाण होते, एकतर्फ़ी प्रेमातुन मुलींच्या हत्या,त्यांच्यावर ऍसिड फ़ेकणे, बलात्कार होणे, या ना अशा किती तरी अमानुष घटना आज आपल्या समाजात घडत असून आपण नुसती बघ्याची भूमिका घेत असतो. खालच्या वर्गात तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. हे असेच वर्षानुवर्षे चालतच राहिल.-कारण स्त्रीला निसर्गानेच शारिरीक दृष्ट्या एक बाजू कमकूवत दिली आहे. शारिरीक सौंदर्यामुळे स्त्री अशा अत्याचाराला बळी पडते. आज ती एकटी रात्रीच्या वेळी बाहेर जावु शकत नाही, मग ती कोणत्याही वयाची असो! कारण बलात्कार फ़क्त स्त्रियांवरच होतो, पुरुषांवर नाही.या एकाच गोष्टीत पुरुष स्त्रीच्या पुढे आहे म्हणुन तो तिच्यावर वर्चस्व गाजवु पहातो. आज बलात्कारी स्त्रीला न्याय मिळवताना कोर्टापुढे पुन्हा पुन्हा शाब्दीक बलात्काराला सामोरे जावे लागते. न्यायासनाची ही क्रूर थट्टा पूर्ण थांबली पाहिजे. कुटुंबाने, समाजानेच यात पुढाकार घेवुन बलात्कार करणा-यास योग्यते शासन केले पाहिजे. भारताने स्वातंत्र्याची आज इतकी वर्षे पूर्ण केली, तरी आजची स्त्री ही अभागनच राहीली. आज ३३% आरक्षणासाठी तिला संसदेच्या संमतीची वाट बघत बसावे लागते. तिची ही स्थिती म्हणजे स्त्री जीवनातील रखरखीत वास्तव्य आहे. प्रश्न हा पडतो , कि अशा घटना आपण टाळू शकतो का? निश्चितच उत्तर "हो" असेल. कारण या विश्वातल्या सप्त रसांचा, सप्त गुणांचा –दया, क्षमा, शांती,प्रेम, वात्सल्य,पावित्र्य अन्‌ मांगल्याचा संगम झाला, आणि आजच्या या 'स्त्री' ने जन्म घेतला. तिच्या नाजुक पायात रुढींच्या बेड्या ठोकल्या होत्या. आज स्त्रीला शिक्षण मिळालं, विकासाच्या संधींच खत पाणी मिळालं, आणि स्त्री रुपी बोनसायचा एक दिवस वटवृक्ष झाला. संसार (कुटुंब) संभाळून ही तिन आपलं कार्यक्षेत्र कधी व्हॊलेंटीना तेरेश्कोवा किंवा कल्पना चावला बनून अवकाश याना पर्यंत नेलं आहे. तर कधी बचेंद्रीपाल म्हणुन एव्हरेस्ट ही सर केलं आहे. आपल्या समोर अनेक आदर्श असताना नाउमेद होवुन चालणार नाही. किरण बेदी, कल्पना चावला, इंदिरा गांधी,अंजली भागवत,पी.टी.उषा, डॊ.राणी बंग, डॊ. अनिता अवचट, सुनिता आमटे,इ अशा अनेक क्षेत्रात भरारी मारलेल्या स्त्रियांची नावे आपण देतो. कल्पना चावला बद्दल आपल्याला सगळ्यांना माहितच आहे.या एकमेव पहिल्या भारतीय महिला –अंतराळ विरांगना ठरलेल्या स्त्रीचा असा दुर्देवी अंत सा-या जगाला चटका लावुन गेला. तर आज सतत ५वर्षे ट्कून रहाने अवघड असताना सतत १०  वर्षे महिला पंतप्रधान म्हणुन भारताच्या छाताडावर राज्य करणा-या इंदिरा गांधी ही एक महिलाच होत्या. या आणि अशा अनेक स्त्रियांनी आपले वर्चस्व सिद्धकरुन दाखवल आहे. आपल्या देशाची, या जगाची नागरीक म्हणुन तिनं आपलं कुटुंब संभाळण्याचं कर्तव्य पार पाडून मानवाला आव्हानच जणू दिलं आहे. म्हणुन तिला म्हणतात,"जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी" . पण नुसती पाळण्याची दोरीच तिच्या हाती देण्या ऐवजी विश्वरथाची दोरी दिल्यामुळे तिने–

     "या देवी सर्व भूतेषू शक्तीरुपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: "

--सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर.
(July 7, 2010)
--------------------------

                      (साभार आणि सौजन्य-पालवी.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.