पालवी-स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-4-अ

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:47:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "पालवी"
                                       ---------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी यांच्या "पालवी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य"

                            स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-4--
                           -------------------------------

     हे वचन सिद्ध करुन दाखवले आहे. प्रत्येक स्त्रीच्या मग ती ग्रामिण असो,किंवा शहरी असो,  तिच्यात एक अशी सुप्त शक्ती असते,की कोणत्याही येणा-या त्सुनामी संकटाशी दोन हात करु शकेल. निसर्गानेच तिला ही शक्ती दिली आहे. आज स्त्रिला असेच स्वातंत्र्य हवे आहे. आपल्या सुप्त गुणांनी ती दुस-याचे ही जीवन फ़ुलवते. वरिल स्त्रियांच्या उदाहरणांवरुन असे दिसून येते कि, मिळालेल्या संधीचे सोने करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. तिच्यातील सामर्थ्याला व गुणांना वाव मात्र मिळायला हवा. शारिरीक सामर्थ्या बरोबरच आवश्यक आहे ते म्हणजे मानसिक सामर्थ्य .अपमान , अन्याय, अत्याचार , यांना जवळपास फ़िरकू द्यायचे नाही, एवढी हिम्मत प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगी बाळगलीच पाहिजे. स्त्रीने च स्त्रीची दोस्त बनणे काळाची गरज आहे. संसारात संतुष्ट स्त्री म्हणजे साक्षात ऐश्वर्य लक्ष्मीला आमंत्रण देणारी गृहलक्ष्मीच असते, याची जाणीव बहुसंख्य पुरुषांना नसते. काही जणांना पत्नी म्हणजे "पायाखालील वहाण" वाटते. ते तिच्या कडे विकृत दृष्टीनेच बघतात.काहीजण तिचा सारखा अपमान, पाणउतारा करतात .तर काही जण मारहाण करुन तुछ्च, नीच प्रवृत्तीने तिला वागवतात. अशावेळी दुस-या स्त्रियांनीच तिच्या संकटकाळी मदत करणे , चांगल्या गोष्टींना प्रोत्साहीत करणे , व समाजाकडून तिच्यावर होणा-या अन्यायाच्या वेळी बघ्याची भूमिका न घेता ,तिच्या साहाय्यास धावुन जाणे इ.इ. ब-याच बाबतीत 'स्त्री च स्त्रीची उत्तम मदतनीस' होवु शकते. त्यामुळे तिची मानसिक व शारिरीक कुचंबणा होणार नाही. मग पहा "स्त्री शक्तिची शक्ती" .कुणाची हिम्मत होणार नाही तिला छळायची,त्रास द्यायची. कारण स्त्री शक्ती एकत्र आली,तर काहीही करु शकते. "अबला नहीं सबला है तू, नारी नहीं चिंगारी है तू !" क्षणात काहीही करण्याची तिची ताकद आहे. राधे सारखे प्रणयिनी रुप, गौरी सारखे ममतामयी रुप,किंवा प्रसंगी दुर्गे सारखे संहारक रुप , आदिमातेने घेतले आहे.या प्रमाणे देवीच्या निरनिराळ्या अवताराची ही स्त्री रुपे आहेत ,हे  आपल्याला माहित आहे. 'स्त्री' ची अनंत रुपे डोळ्यासमोर उभी आहेत.......वात्सल्यमूर्ती, विश्वाचं चैतन्य बीज , त्यागाची प्रतिमा, अनंत काळाची माता ...इ. केशवसुतांसारखे प्रतिभावंत महाकवी सुद्धा "भुपृष्ठेस्थित आद्ददैवत" असा तिचा उल्लेख करतात. आजचे स्त्री स्वातंत्र्याचे स्वरुप पहाता ते आभास आहे का? असे वाटत असतानाच , जाणवते कि ,नाही ! पूर्वी पेक्षा किती तरी पटीने आज सुधारणा झाली आहे. आजची स्त्री ब-याच अंशी स्वतंत्र आहे.    स्वातंत्र्याची संकल्पना साकार करताना , आपल्याला हवे असे स्वातंत्र्य मिळवताना प्रथम स्त्रीने आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. तिच्या आयुष्यातील काही क्षण तिला फ़क्त स्वत:साठी जगण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. "सातच्या आत घरात" फ़क्त स्त्रीने पुरुषांच्या भीतीने परतले पाहिजे हा लिंगसापेक्ष भेद संपला पाहिजे. "शुभस्य शीघ्रम" या उक्ती नुसार परिवर्तन घडले पाहिजे. एक"माणुस" म्हणुन तिचं स्वत्व,तिच्या अस्मितेची जपवणुक व्हायला हवी, एवढी माफ़क अपेक्षा. "स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे" याचे पुरेपूर भान तर तिला अहेच. स्वातंत्र्याचा दुरुपयोग पण तिने  नाही घेतला पाहिजे. "पुरुषांबरोबर स्पर्धा म्हणजे स्त्री स्वातंत्र्य" हे ही तिला मान्य नाही. फ़क्त पुरुषांची दासी न बनता त्याची सहकारी ,मित्र म्हणुन राहायची तिची इच्छा आहे. स्त्री व पुरुषांचे समाजात सहजीवन हवे. समाजरुपी पक्षाचे दोन पंख म्हणजे स्त्री –पुरुष होय. दोन्हीही सारखेच सामर्थ्यशाली हवेत. राममनोहर लोहिया ऐके ठिकाणी म्हणतात, " स्त्री ही देवी ही नाही , व दासी ही नाही. स्त्री ही माणूस आहे. तिला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण हक्क आहे."

--सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर.
(July 7, 2010)
--------------------------

                      (साभार आणि सौजन्य-पालवी.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.