शब्द सौंदर्य-ध्यानाचे प्रकार-विचार ध्यान--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:52:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "शब्द सौंदर्य"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "शब्द सौंदर्य" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ध्यानाचे प्रकार-विचार ध्यान"

                      ध्यानाचे प्रकार-विचार ध्यान--क्रमांक-१--
                     ----------------------------------

     चीन मध्ये एकदा एक माणसाने एका भिक्षुकडे हट्ट धरला... महाराज मला एखादा मंत्र द्या ज्याला मी सिध्द करू शकेल आणि ज्या मंत्राच्या सिध्द केल्याने मला लाभ होईल.. भिक्षुने नकार दिला पण तो माणुस काही ऐकायला तयारच नव्हता, सकाळची संध्याकाळ झाली पण तो माणूस काही भिक्षुचा पिच्छा सोडत नाही असे बघुन त्याला एक मंत्र सांगितला आणि सागितले की या मंत्राचा पुढच्या पंधरा दिवसांच्या आत सलग सात दिवस ठराविक वेळा जप करावा लागेल तरच हा मंत्र सिद्ध होईल, जर पुढच्या पंधरा दिवसात तु हा मंत्र सिद्ध नाही केला तर हा मंत्र काही कामाचा राहणार नाही.

     मंत्र घेऊन तो माणूस आनंदाने घरी चाललाच होता की तेव्हढ्यात त्या भिक्षुने त्याला मागुन आवाज दिला. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलि. भिक्षु म्हणाले. या मंत्राचा माकड खुप मोठा दुश्मन आहे जर मंत्र जपाच्या सात दिवसांत एकदा जरी तुझ्या मनात माकडाचा विचार आला तर तुला दुसर्‍या दिवशी पुन्हा सुरवात करावी लागेल, त्यामुळे काहीही झाल तरी एक लक्षात ठेव, तुझ्या मनात माकडाचा विचार नाही आला पाहिजे याची काळजी घे. भिक्षुने चेतावणी वजा सूचना दिली. हो, तसाही कोणाच मन माकडाचा विचार करतं पण तरीही तुम्ही म्हणताय तर मी माकडाचा विचार नाही करणार. तो माणूस म्हणाल आआणि निघून गेला.

     नऊ दिवसाने तो माणूस पुन्हा त्या भिक्षुकडे आला यावेळी चेहर्‍यावर भलतीच निराशा होती. काय झाल? झाला का मंत्र सिद्ध? भिक्षुने विचारले. कसल काय महाराज मी रोज जपाला बसलो की कोठुन काय माहीत पण माझ्या मनात माकडाचाच विचार यायचाच, इतकेच काय तर कधी नव्हे ते मला स्वप्न सुध्दा माकणाचेच पडू लागले. मी खुप प्रयत्न केला, रोज मी ठरवायचो की आज माकडाचा आजिबात विचार करायचा नाही पण पुन्हा पुन्हा तेच. माणसाने सांगितले...

     वरच्या गोष्टीत आपल्याला अस आढळून येते की तो माणूस overthinking मध्ये अडकलाय. पण का? ज्या माकडाचा साधारण पणे आपण विचार करत नाही त्या माकडाच्या विचाराने त्याच्या हातातील संधी घालवली. पण अस का झाल? आपल्यासोबत पण कित्येकदा अस झाले असेल ना की एखादि गोष्ट, घटना किंवा विचार आपण विसरायचा प्रयत्न करतो तर तो विचार आपल्याला आणखी त्रास द्यायला चालू करतो.

     कित्येकदा तर आपण दिवस दिवस एकच विचार सतत करत राहतो तेही आपली ईच्छा नसताना. बरोब्बर ना? मी जर असे म्हटले कि आपण स्वतःच आपल्याला नको असणाऱ्या विचारांना सतत आपल्या मनात चालू राहण्यासाठी उर्जा पुरवत असतो, तर? तो कसा काय? तर याच उत्तर आहे त्या विचारांचा विरोध करून. मला नेमक काय म्हणायचे आहे ते आपण उदाहरण घेऊन समजूया. आपण नको असलेल्या विचारांना विरोध करणे म्हणजे माठात ओतलेल्या विहिरीच्या पाण्यातली माती तळाला बसली का हे पाहण्यासाठी आपला हात घालुन माठाचा तळ चाचपडण्या सारख आहे. आपण जीतक्यावेळा माठाच्या तळाला हात घालु तितक्याच वेळा आपण आपल्या हाताने तळाशी साचलेली माती पुन्हा पाण्यात मिसळून पाण्याला गढूळ करेल. आता आपण माठातले पाणी स्वच्छ करण्यासाठी दोन्हीपैकी एक गोष्ट करू शकतो.

१ --कुठलाही हस्तक्षेप न करता माती तळाशी बसेपर्यंत वाट पहाणे.
२ --तुरटीचा वापर करून किंवा एखाद्या गाळणीचा वापर करून पाणी स्वच्छ करणे.

--शब्द सौंदर्य
(सप्टेंबर ०९, २०२२)
-----------------

                      (साभार आणि सौजन्य-शब्द सौंदर्य.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     ------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.