शब्द सौंदर्य-ध्यानाचे प्रकार-विचार ध्यान--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:54:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "शब्द सौंदर्य"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "शब्द सौंदर्य" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ध्यानाचे प्रकार-विचार ध्यान"

                      ध्यानाचे प्रकार-विचार ध्यान--क्रमांक-2--
                     ----------------------------------

     आता तुम्ही कदाचित म्हणाल की याचा over thinking शी काय संबंध? तर ते समजण्यासाठी हेच उदाहरण संदर्भ म्हणून घेऊन. अस समजू कि तो गढूळ पाण्याने भरलेला माठ आपल मन आहे, त्यातली माती म्हणजे आपल्याला नको असलेले विचार आहेत. आपण नको असलेल्या विचारांना विरोध करण म्हणजे त्या माठात हात घालून पाहण्या सारखे आहे जितका आपण आपल्या विचारांना विरोध करू तितकेच आपल्याला नको असलेले विचार आपल्या मनात वर उठतील तर मग यावर उपाय काय? तर जस पाण्यातला गाळ खाली बसवण्याचे दोन उपाय आहेत तेच उपाय आपल्या मनासाठी सुद्धा काम करतात. एक जसा जसा वेळ जाईल तसे तसे जर आपण त्या विचाराचा विरोध करण हळूहळू कमी केले की तो विचार क्षीण होऊन आपल्याला त्रास द्यायचे बंद करेल. पण हा उपाय खुपच वेळखाऊ आणि त्रास दायक आहे कारण आपल्याला नको असलेल्या विचारांना आपण स्वाभाविकपणे विरोध करतो जो त्या विचारांना बलवान करतो. दुसरा उपाय म्हणजे ध्यानरूपी गाळणी वापरून मनाच्या अति विचार करण्याची प्रवृत्ती कमी करणे. यालाच आपण अतिविचारा पासुन मुक्ती कशी मिळवायची? किंवा How to get rid of overthinking? असे म्हणू शकतो.

               विचार ध्यान म्हणजे काय?--
येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचे कोणताही हस्तक्षेप नकरता साक्षीदार होऊन फक्त आणि फक्त निरीक्षण करणे म्हणजे विचार ध्यान.

               विचार ध्यान कसे करायचे?--
१) शांत ठिकाणी कंबर, पाठ आणि मान सरळ राहिल असे ङोळे बंद करून बसा
२) मनात जो काही विचार येईल त्या विचारांचे साक्षीदार होऊन निरीक्षण करा. निरीक्षण करताना तो विचार चांगला आहे की वाईट होता असे कोणत्याही प्रकारची लेबलींग करू नका फक्त विचार आला तर विचार आलाय एवढेच भान ठेवा... कधी कधी असे देखील होईल की अक्षरशः घाणेरडे विचार येतील त्यावेळी ते विचार का आले, कशासाठी आले कींवा ईतर कोणत्याही प्रकारचा विचार किंवा विरोध करू नका, किंवा चांगले विचार आले तर त्या विचारांमध्ये गुरफटून जाऊ नका त्या ऐवजी येणाऱ्या विचारांची भावनाहीन पणे फक्त नोंद घ्या आणि जागरुक रहा.
३) आपण ध्यान कोणत्याही प्रकारचे करत असु प्रत्येकाला लक्ष विचलित होण्याचा सामना करावा लागतो पण चिडचिड करण्या ऐवजी फक्त आपले लक्ष विचलित झाले आहे हे लक्षात घेऊन पुन्हा ध्यान करण्यावर शांतपणे मन केंद्रित करा.

     आनापान ध्यान सुध्दा overthinking वर चांगला उपाय आहे.

     मी माझ्या ध्यान प्रवासाबद्दल व्यक्त मन - भाग 2 ध्यान  या पोस्ट मध्ये सांगितले आहे ती पोस्ट देखील वाचायला विसरू नका. ध्यान या विषयावर आणखी काही पोस्ट या ब्लॉगवर आहेत त्यााही तुम्हाला नक्कीच आवडतील.

     तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली हे सांगा कींवा नका सांगू पण कीमान दोन महिने रोज अर्धाच तास किंवा किमान 15-20 मिनिटे ध्यान करण्यासाठी देऊन ध्यान करण्याच्या फायद्यांचा अनुभव नक्कीच घ्या...

--शब्द सौंदर्य
(सप्टेंबर ०९, २०२२)
------------------

                       (साभार आणि सौजन्य-शब्द सौंदर्य.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                      ------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.