मनाचे-तरंग-कोरिगड (Korigadh)--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 10:51:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मनाचे-तरंग"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री दर्शन यांच्या "मनाचे-तरंग" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "कोरिगड (Korigadh)"

                          कोरिगड (Korigadh)--क्रमांक-१--
                         -------------------------------

     पाऊस,मुंबई आणि ट्रेक्किंगच नात काहि अजोड आहे. म्हणजे मी काही सर्वे केलेला नाहि पण,पाच पन्नास छोटे मोठे ट्रेक्किंग ग्रुप मुंबई च्या आसपास कर्यरत असावेत.हया पावसाची आणि ट्रेक्किंग ची मजा, सैह्याद्रिच्या प्रेमात पडलेल्या त्या वेडया वानर वीरांनाच माहित.

     12ची बस म्हंणजे तसा ऊशीर व्हायची काहि गरज नाही.  पण  काय  करणार, जेवून आणि गाडीच वेलपत्रक सांभाळून  वसईला पोहोचायला 12:30 झालेच.कल्पेश आणि सगळी जमा झालेली मंडळी चांगलीच वैतागली असणार. अर्थात आम्ही पोहोचल्यावर रीतसर माफी वगैरे मगितली आणि मामला तिथेच पटवला.

     मागचा पावसाळा ट्रेक्किंग शिवाय सुक्का गेल्यामुळे, भलतीच आतुरता होती. त्यातच या  वर्षीही मागचा टकमकचा ट्रेक miss  झाला होता. तेव्हा थोडी धाकधूक होतीच.  पण एकदाचे बस मध्ये बसलो आणि एक मोठा हुश:  करून ट्रेकर्स च्या वारी मध्ये सामील झालो.

     उशीर झाल्याच्या पेनल्टीची बोलणी, डोकं टेकायला नसलेल्या  सीट्स, नितांतच्या लग्नाची गम्मत, मच्छरांनी वैतागलेली गीता आणि ईतर काहि गप्पा  मारत आम्ही evershine आणि चिंचोटी फाट्यावरून आणखी ४, ५ जणांना आमच्या वारीत सामील करून घेतलं.

     हळू हळू डुलकी काढत आम्ही घोडबंदर मार्गे highway पकडला. मधेच थोडा डोळा लागला आणि कधी लोणावळा आला ते कळला सुद्धा नाही.  थोडे पाय मोकळे करून आणि प्रातर विधी आटोपून पुढचा प्रवास चालू झाला. मस्त काळोखी पहाट. सकाळचे ५ वगैरे वाजले असावेत. बुशी dam च्या रोडला गाडी लागली आणि उजव्या बाजूला लांबलचक ब्रिटीश काळातील एक धरण दिसलं. विनयने मग आधी त्या धरणाच पाणी इंजीनसाठी आणि नंतर पिण्याच्या पाण्यासाठी कसे वापरले जायचे त्याची माहिती दिली.

--दर्शन 
(Saturday, 27 October 2012)
--------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-मनाचे-तरंग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.