मनाचे-तरंग-कोरिगड (Korigadh)--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 10:53:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मनाचे-तरंग"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री दर्शन यांच्या "मनाचे-तरंग" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "कोरिगड (Korigadh)"

                          कोरिगड (Korigadh)--क्रमांक-2--
                         -------------------------------

     पूढच्या रस्त्याला धुक्याने वेटोळा घातला होता.  ड्रायवर  आणि आम्ही जीव मुठीत घेवून पुढची मार्गक्रमणा करत होतो. झोप तर चांगलीच उडली. वळणावळणाचा रस्ता, धुक्याचा जाड पडदा, रिमझिम पाउस, थोडी भीती, थोडी मजा, एक थोडीशी नजर चूक आणि गाडीने वर कोरीगड ऐवजी, खाली Amby valley चा रस्ता धरला असता, अर्रे नाही sorry, बनवला असता :)

     सकाळच झुंजू मुंजू वातावरण, पावसाच्या सरिंनी ओला झालेला रस्ता, निर्मनुष्य बस स्टॉप, डुलत, ढूश्या देत, बागडत चाललेले खिल्लारी बैल, गाई आणि म्हशी आणि त्यांना हाकारत, रस्ता ओलांडून समोरच्या हिरवाइन नटलेल्या डोंगरावर मेजवानीसाठी चाललेली हि टोळी. एकदम झक्कास वाटत होत.

     समोरच्या डोगर दरया, श्रावण सरींनी नटलेली हिरवी हिरवी झाड, सगल पाहिल कि मन एका झटक्यात सगळ्या पोटापाण्याच्या आणि रहाटगाडाग्याच्या चिंता विसरुन जातात. लक्षात येत कि आपण या रोजच्या धाकधाकीपासून किती दूर आलोय. रोजच्या जीवनात दिसते ती ट्रेनची गर्दी, रोडवरचा ट्राफिक जॅम, प्रोजेक्टच्या deadlines, वर्तमानपत्रात रोजच्या रोज येणारे भ्रष्ट politicians चे घोटाळे. पण यार खूष राहायला, शांती समाधानाने आयुष्य जगायला नक्की  काय पाहिजे. फार काही नाही. खर तर फारच थोडक. आणि हे सगळा सुचत होत, नाही उमजत होत ते रमत गमत गाई, बैलांना हाकत चाललेल्या त्या गुराख्याकडे पाहून.

     काल पर्यंत त्या  रहाटगाडाग्याच्या चिंतेत अडकलेला मी, नवीन प्रोजेक्ट च्या चिंतेत असलेलेला, increment cycle जावूनही पगार न वाढल्यामुळे थोडा चिंतेत असलेलेला, global slowdown मुळे आणि प्रोजेक्ट्स कमी झाल्यामुळे, एकंदर software व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्यामुळे भांबावून गेलेलेला. पण गम्मत पहा, एका मिनिटात ते सगळ गौण वाटायला लागल. पटकन विसरूनही गेलो.

     तर हा असा निसर्ग, आपण कितीही दूर जावूदेत, कितीही practical वैगैरे होण्याची मित्थ्या बडबड करूदेत, कितीही technological प्रगती करूदेत, शेवटी ती मनाची शांती आणि मुक्त आकाशात भरारी मारण्यासारखा आनंद कुठे मिळतो. ह्या डोंगरांच्या कुशीतच ना. बस फक्त सगळ्या चिंता बाजूला सारून, आपल्या आवडीच्या trekker group बरोबर निघून यायच आणि निसर्गाच्या कुशीत सगळी चिंता उडवून टाकायची आणि करायची फक्त आणि मुक्त धम्माल, अगदी थोडा वेळ का होईना, पण आपल्या हक्काची मजा.

--दर्शन 
(Saturday, 27 October 2012)
--------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-मनाचे-तरंग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.