मनाचे-तरंग-कोरिगड (Korigadh)--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 10:54:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मनाचे-तरंग"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री दर्शन यांच्या "मनाचे-तरंग" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "कोरिगड (Korigadh)"

                          कोरिगड (Korigadh)--क्रमांक-3--
                         -------------------------------

     मस्त पैकी फक्कड चहा, वेज प्याटिसने पोटाला आणि मनालाही चांगलच ताजतवानं केलं. ओढ लागली होती ती धुक्याची दुलई ओढण्याची, रान फुलांचा वास घेण्याची, दाट जंगलात हरवून जाण्याची आणि हिरवळीवर बसून गप्पा ,मारण्याची, poses  देवून  photography करण्याची, हिरव्या हिरव्या गार गालिच्यावर फुलराणी कुठे दिसते हे पाहण्याची. मला भाऊ कविता वगैरे काही करता येत नाहीत. पण बालपणीच्या काही कविता मनाच्या मातीत अशा काही रुजलेल्या आहेत, कि उखडून काढणेही अशक्य.

     आयुष्याच्या फास्ट ट्रेन मध्ये बसलेले असताना, आणि पटापट स्टेशन्स येवून जात असताना, काही स्टेशन्सवरचे असे काही क्षण असेच लक्षात राहतात. VAC (Vasai  Adventure Club ) ने दिलेले प्याटिस खाताना एखादा extra प्याटिस मिळाला तरी त्या  वेळी त्यात जब्बर धम्माल वाटते. छोट्या छोट्या गोष्टीत मज्जा वाटते आणि हसायला विसरलेली कित्तेक माणसं पोट धरधरून हसताना दिसतात.

     वाटोळ्यांमध्ये उभे राहून, ओळखी पालखी झाल्यावर आणि हर हर महादेवच्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या गर्जंना झाल्यावर, आम्ही सारे मावळे गड सर करायला मार्गस्थ झालो. लाल माती, श्रावण सरींनी ओली झालेली जमीन, दूर धुक्याच्या मागे लपंडाव खेळणारा कोरीगढचा कडा आणि आजूबाजूला सर्वत्र पसरलेलं, हिरवाईन नटलेल, गार वाऱ्याच्या झुळकीन मन शांत करणार, धुंद सरींनी मनाला आणि शरीराला ओल करणार माळरान आणि दाट जंगल.

     श्रावणमासी हर्ष मानसी करत डुलत डुलत चालणारे नितांत आणि मानसी, आत्ताच लग्न झालेले असल्यामुळे अर्थात सर्वांच्या थट्टा मस्करीचे केंद्र असलेले. Digital कॅमेऱ्याची compitition,  झूम करून रान फुलाचं सौंदर्य टिपण्याचे धडपड करणारे काही कॅमेरापटू. फक्त साडेसात वाजलेले असल्यामुळे वेळेची चिंता नव्हती.

     गडाच्या कच्च्या पायऱ्यांवरून वाहणारे, नव्हे झूळंझूळणारे प्रवाही पाणी, अगदी प्रवाही आयुष्यासारखं, कुठेही न थांबणार, आणि सतत वाहत राहणार. सर्वत्र पसरलेला रान फुलांचा गालीचा मन मोहवत होता. तटाच्या भिंतींवर पसरलेले रानवेलही नाजूक-साजूक, जांभळी-गुलाबी, ईटुकली-पिटुकली फुलं ल्यायले होते. सर्व काही मंत्र मुग्ध करणारे. असल्या वातावरणात मग कसल्या चिंता मनाला शिवणार हो. नाही त्या पळून जातात एकदम लांब.

     जाताना दिसणारा पवना dam चा जलाशय, ambi valley चा नयनरम्य परिसर आणि लांबवर दिसणारी छोटी छोटी गावं, फक्त ध्यान मुग्ध होवून पहात बसाव असं. कुठचा कॅमेरा हि ईतकी नवलाई memory कार्ड मध्ये बंद करणार, फारच कठीण.

     अगदी तासाभरात आम्ही वर पोहोचलो असू, धुक्याने सर्वत्र दुधी रंगाच्या भिंत्ती उभ्या केलेल्या होत्या. त्या मुळे गडाचे दर्शन, ते ज्या angle ने मिळेल तेच द्रुश्य मनात साठवत होतो. गडावर चारही बाजूंच्या अजूनही पूर्ण शाबूत असलेल्या ताटावरून पूर्ण एक चक्कर मारली तरी गडाच पूर्ण चित्र उभं करणं कठीण. हिंदी फिल्म मधल्या एखाद्या suspense scene साठी, किव्वा एखाद्या romantic गाण्यासाठी साजेसा माहोल. दीड दोन फुटांवरच कसबस जे दिसते ते पाहत, एकमेकांना कुठे आहेत ते चाचपण्यासाठी "येवो~~", "येवो~~" च्या आरोळ्या ठोकत वरची तीन देवळ देखीन पाहून घेतली.  तीनही देवळ आता नीट बांधलेली आहेत.  गणपतीच्या देवळाच्यापाठि तर भला मोठा तलाव देखील आहे.  नमस्कार करून आम्ही कोरीदेविच्या देवालयाच्या बाहेर जेवणासाठी पथारी पसरली.

     चांगली कडकडीत भूक हि काय असते ते ट्रेकला गेल्या शिवाय नाही कळंत. आणि मग झुणका भाकर काय किव्वा बटाटयाच्याच्या भाजीचा sandwitch काय सगळीच चव अमृत. श्रावणाची पासपोस नसलेले तर झिंगे आणि तंगडी तोडत होते.  पण काही म्हणा कुठलीही अंग मेहनत करून मग जेवल तर जेवणाला काही वेगळीच चव येते. आणि मग बाजूचा निसर्ग असा सुंदर सजलेला असेल तर आणखीनच मजा.

--दर्शन 
(Saturday, 27 October 2012)
--------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-मनाचे-तरंग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.