माझं स्वैर लेखन-असा खयंच नाय खावक

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 11:14:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "माझं स्वैर लेखन"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री नरेंद्र प्रभू यांच्या "माझं स्वैर लेखन" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "असा खयंच नाय खावक"

                                असा खयंच नाय खावक--
                               ---------------------

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

घावणे, आंबोळ्यो, खापरोळी आणि ताटाभोवती रांगोळी

नारळाचो रस, वाटाण्याचा सांबार बगून आंघोळीक मारतलस गोळी

आवशीच्या हातचा कुळताचा पिठला आणि तांदळाची भाकरी

अरे नाष्टो काय खाशीत फुडे गम्मत आसा खरी

ती विचारतली आता काजी भाजूया काय कलिंगण व्हया खावक

उताणी पडान म्हणशीत आवशी पोटात जागा नाय गे रवाक

म्हणान, मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

दुपारच्या जेवणाक गोलम्याची कोशंबीर आणि बांग़ड्याचा तिकला

भाताबरोबर भुरकूक कर्लीचा निसत्याक आणि वांग्या पण भरला

ताजो फडफडीत इसवण आजून वाट बगतलो तव्यार

अर्दाच जेवन झाला तरी येतला ता आंगार

ती म्हणात इतक्याय जमणानाय तर इलं कित्या झकमारूक

मगे तेच्यार जिरवणी म्हणान देतली सोलकडी पिऊक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

आरावलेलो कोम्बो कदीतरी गप जातलो

सागोती म्हणान वड्याबरोबर ताटात येतलो

दुपारी इतक्या जोवलस तरी आडवो हात मारतलस

पोटाकडे बगून आता खुप झाला म्हणतलस

आजून आये बगतली वाकान तूका वाडूक

चवच तशी म्हणत चघळत रवतलस हाडूक

मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक

कितीय रवलस तरी म्हणतली फक्त दोन दिवस रव

आजून खय बगलस तू जत्रा आणि फिरान ह्या गाव

जत्रेतला खाजा आणि लाडू देतली बांदून

परड्यातली ताजी भाजी देयत कुशीक सारून

म्हणतली परत येशीत तेवा मात्र दिवस काड रवाक

ह्या पावटी इलस तरी कायच नाय खावक

म्हणान तुका सांगतय चल बगया माझ्या गावाक

अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय खावक

--नरेंद्र प्रभू   
27 August, 2022
-------------------

                  (साभार आणि सौजन्य-प्रभू नरेन्द्र.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.