माझी भटकंती...-माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ....क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 11:17:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "माझी भटकंती..."
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री विशाल विजय कुलकर्णी यांच्या "माझी भटकंती..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ...."

                 शिर्षक: माझी फ़ोटोग्राफ़ी-डेमाँस्ट्रेशन ....क्रमांक-2--
                --------------------------------------------

     तेवढ्यात एक पोर्टर सांगत आला.

"मुंबईसे आयी हुयी IC flight का कुछ लगेज बेल्ट नंबर तीन परभी आ रहा है!"

     आम्ही धावत पळत तिथे..., माझी केस दिसली आणि जिवात जिव आला. केस आणि ट्रायपॉड (मेटॅलिक स्टँड) ताब्यात घेतले आणि प्रिपेड टॅक्सीच्या बुथ कडे धाव घेतली. वेळ झाली होती २ वाजुन २५ मिनीटे! हुश्श... बर्‍यापैकी वेळ हातात होता अजुन. अर्थात दिल्लीमधल्या ट्रॅफिकचा काही भरवसा देता येत नाही. त्यात विमानतळापासून नवी दिल्ली रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता तर अगदीच गजबजीचा. टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले....

"भैय्या पहले ए.सी. चालु करो और नई दिल्ली चलो. सवा तीन बजे से पहले पहुंचना है!"

     आत्ता माझ्या लक्षात आले, सकाळी मुंबईत धो धो पाऊस होता आणि इथे ३३-३४ तापमान होतं.  तो पठ्ठ्या मात्र तयारीचा होता. ३.१० ला गाडी टच केली हिरोने. परत नवी दिल्ली स्टेशनवर उतरल्यावर तेवढ्यातल्या तेवढ्यात हमालाशी घासाघिस करुन मी माझा मराठी बाणा घासुन पुसुन लखलखीत करुन घेतलाच.कसेतरी करून गाडी पकडली. डेस्टिनेशन मीरत.....!

     रात्री तिथेच मुक्काम करुन सकाळी कस्टमरकडे गेलो...अर्थात डेमोसाठी!

                       १ सप्टेंबर २०१०

     मघापासुन मी डेमो-डेमो करतोय, तुम्हाला प्रश्न पडला असेल कसला डेमो? तर आमची कंपनी डिजीपीएस सिस्टीम्स बनवते, विकते.
DGPS stands for Differential Global Positioning system.

     सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास जीपीएसचा वापर मॅपींग (नकाशे) साठी केला जातो. मग त्यात रोड सर्व्हे, पाईपलाईन सर्व्हे, जी.आय.एस. (geographic information system as an framework for managing and integrating data) सर्व्हे, एअरो फोटोग्राफी अशा विविध कारणासाठी केला जातो.

               जीपीएस अर्थात ग्लोबल पोजिशनींग सिस्टीम काय करते?

     तर एखाद्या स्पेसिफिक जागेचे कॉर्डिनेटस अर्थात अक्षांश, रेखांश आणि त्या जागेची समुद्रसपाटीपासुनची उंची देते. या तिन्ही गोष्टी कुठल्याही स्थळाचे/जागेचे अ‍ॅटलासवरील (जगाचा नकाशा) स्थान निश्चित करत असते. सर्वसाधारण जीपीएस सिस्टीम ५ ते १० मिटर किंवा जास्तच अ‍ॅक्युरेसी देते. म्हणजे जी.पी.एस. ने दिलेल्या पॉईंटपासुन ती नेमकी जागा ५-ते १० मिटरच्या परिसरात कुठेही असु शकते. आता तुम्ही म्हणाल एवढा जर फरक पडत असेल तर काय उपयोग? तर अ‍ॅक्युरेसी वाढवण्यासाठी डिफरंशिअल सर्व्हिस वापरली जाते. म्हणजे एकाच्या ऐवजी दोन किंवा जास्त जी.पी.एस. सिस्टम्स वापरुन त्यांच्यापासुन मिळालेल्या माहितीची सरासरी काढून जास्तीत जास्त अ‍ॅक्युरेसी मिळवली जाते.

            So here comes OmniSTAR! Our company !

     ओमनीस्टारने जगभरात जवळपास १२० बेस स्टेशन्स बसवली आहेत अद्ययावर जी.पी.एस. सिस्टम्ससहीत. ही बेस स्टेशन्स कायम २४/७ , विविध सर्व्हे सॅटेलाईटकडुन कच्चा डेटा (raw data)  गोळा करत असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास अमेरिकेने सुरुवातीला त्यांच्या डिफेन्स सर्व्हिसेससाठी काही (२८) उपग्रह अवकाशात सोडले होते. आता त्याची एकुण संख्या ३२च्या घरात आहे. नंतर हे सर्व उपग्रह नागरी उपयोगासाठी वापरण्यात येवु लागले. प्रत्येक जी.पी.एस. सिस्टीम या उपग्रहांकडुनच पृथ्वीचा सर्व भौगोलिक डेटा जमा करत असते. तर ओमनीस्टार बेस स्टेशनदेखील हा डेटा सतत गोळा करत असतात. हा सर्व डेटा नंतर ओमनीस्टार नेटवर्क कंट्रोल सेंटरला पाठवला जातो, जिथे तो आणखी अ‍ॅक्युरेट बनवण्यासाठी रेक्टीफाय (in technical language it is called as Post processing) केला जातो. नंतर ओमनीस्टारच्या जिओ-स्टेशनरी सॅटेलाईटसच्या साह्याने तो पुन्हा जगभरातील ओमनीस्टार बेस स्टेशन्सला पुनः प्रक्षेपित केला जातो. भारतामध्ये ओमनीस्टार डेटा एशिया पॅसिफिक सॅटेलाईट या उपग्रहाद्वारे प्रक्षेपित केला जातो. मग त्या त्या भागातील बेस स्टेशनच्या परिसरात काम करणार्‍या जी.पी.एस, सिस्टीम्स हा डेटा मिळवु शकतात. आता मात्र या डेटाची अ‍ॅक्युरेसी १०-१५ सेंटीमिटर इतकी असते.

--विशाल विजय कुलकर्णी
(९/१४/२०१०)
-----------------------

                   (साभार आणि सौजन्य-येडचॅप.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.