मराठी चित्रपट-परतू-जीव पिसाटला, पिसाटला रामा

Started by Atul Kaviraje, September 21, 2022, 09:55:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके-अंतर्गत, "परतू" या मराठी चित्रपटातील, श्री. जसराज जोशी यांनी गायिलेले एक गीत. या गाण्याचे शीर्षक आहे- "जीव पिसाटला, पिसाटला रामा"

                             "जीव पिसाटला, पिसाटला रामा"
                            -----------------------------

वेड लावे जीवाला बघुनी तुला
पास असुनी तुझी आस लागे मला
एक क्षणही नकोसा दुरावा तुझा
श्वास माझा म्हणू की पुरावा तुझा
काय होणार माझे कळे ना मला
प्रेम छळते किती हे मला तुला
जीव पिसाटला पिसाटला रामा

बोलणे हे तुझे की फुलांचा सडा
हासता किणकिणे चांदण्यांचा चुडा
एवढासाच शृंगार पुरतो तुला
दृष्ट लागो न माझीच माझ्या फुला
जीव पिसाटला पिसाटला रामा

तूच तू सोबती तूच दाही दिशा
ध्यास हि तूच नि तूच माझी नशा
सावली तू कधी तू उन्हाच्या झळा
सांग डोळ्यात लपवू कसा मी तुला
रंग झालो तुझा रंगता रंगता
आग पाणी जणू एक झाले आता
जीव पिसाटला पिसाटला रामा

===========
गायक -जसराज जोशी
चित्रपट - परतू
संगीत - शशांक पवार
गीत - वैभव जोशी
===========

--प्रकाशक : शंतनू देव
(MONDAY, MARCH 28, 2016)
--------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                            (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                 ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.09.2022-बुधवार.