तुझ्या विना...

Started by mkapale, September 22, 2022, 07:57:30 PM

Previous topic - Next topic

mkapale

आहे जे तुज्या माझ्यामध्ये हे...
न ऐकले न पाहिले असे गूढ काही

वाटे असे जीवन जसे शून्य आहे
श्वासही पोकळ झाले जणू जसे

तुझ्या विना..विना तुज्या..तुज्या विना
झालीये ओसाड माझी हि दुनिया

अनोळखी झाले जणू हे क्षण सारे
पाहती जसे न पाहिल्यासारखे
खोल अशी उदासी आहे चहूकडे
किनारे लाटांमधे विरले सारे
तोही ऐकेना व्याकुळ आर्जव माझे
सांगू कुणा व्यथा तुज्या विना...

तुझ्या विना..विना तुज्या..तुज्या विना
झालीये ओसाड माझी हि दुनिया

काळोखी..सोडला तेजाने हाथ माझा
राहिली संध्याकाळ नशिबी आता
हर एक पहाट जणू रात्र झाली पुन्हा

आहे जे काही तुज्या माझ्यामध्ये हे
न ऐकले न पाहिले असे गूढ काही

तुझ्या विना..विना तुज्या..तुज्या विना
झालीये ओसाड जणू हि दुनिया