निषिद्ध उंबरठे ओलांडताना

Started by chetan (टाकाऊ), July 28, 2010, 03:50:04 PM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

निषिद्ध उंबरठे ओलांडताना
मी मागे पाहणे सोडले
कारण धूत वस्त्रे नेसूनही
बिचारे मनानेच राहिले नागवे

पालथ्या हाताने लाळ पुसत 
मला छी थू करतात 
अन दिसता उभार छातीचे
लाळ गाळत हिंडतात 

प्रेमी युगुले पाहून हे
सभ्य नाके मुरडतात
आणि त्यांची थट्टा करताना
डोळे कोपर्यातून फिरवतात     

त्यांचे प्रणय बघून ह्यांना
तत्परतेने आठवते संस्कृती
पण डोळ्यापुढून हटत नाही
तिची कमनीय आकृती

उफराटे ह्यांचे न्याय
आणि विचित्र हयांच्या तर्हा
छ्या! असं वाटतं ह्यांच्यापेक्षा
कुत्र्यांचा संभोग बरा

पुरे झालं आता हे
धोतर सांभाळत चालण
अन निव्वळ नैतिक समाधानासाठी
स्वतालाच मारून जगण

amoul


shahu

atishay sadetod. mala ekdam suresh bhtanchi athavan aali. Keep posting.