निंद्य पापे दोष विकृती

Started by chetan (टाकाऊ), July 28, 2010, 03:50:57 PM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

निंद्य पापे दोष विकृती   
घडवून गेलीयत सदोष आकृती
चार मण काष्ठे ओढून तयांची , 
सरणातळी निजायचे आहे
मला फिरून पुन्हा जन्मायचे आहे

देह होता स्वछ कोरा
अंतरी वाहे नितळ झरा
त्याला व्यापे बुरसट हिरवे   
अहंकाराचे दाट शेवाळे
आत्मशुद्धीचा घेउनी विळा
उखडून सारे द्यायचे आहे       


मीपण मीपण भरवून पोसला
देहपणाचा हव्यास धरिला
कळीकाळे  सहज सोलले
मागे फक्त फोलपट उरले
तुचछ फोलपट पुरायचे  आहे   
मला नव्याने उगवायचे आहे   

माझ्या मित्राने केलेली
मकरंद केतकर


amoul

छान आध्यात्मिक कविता आणि आत्मज्ञान सांगणारी कविता आहे!! खूप छान