सुरेश भट-गझल-तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही

Started by Atul Kaviraje, September 25, 2022, 09:48:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री. सुरेश भट यांनी रचलेली एक गझल. या गझलचे शीर्षक आहे- "तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही"

                          "तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही"
                         --------------------------------------   

तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही
मी जिवंत आहे - माझा हा प्रमाद नाही !

मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलू
कुणालाच कोणाचीही इथे दाद नाही

हा अथांग सागर उसळे जरी यातनांचा
परत मी घरी जाणारा सिंदबाद नाही

कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना
पुढे काय झाले माझे ? मला याद नाही !

तुला मीच रडतारडता धीर देत आहे
वादग्रस्त माझे अश्रु ह्यात वाद नाही

सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी
बाद होत गेले सारे, मीच बाद नाही

--गझल : सुरेश भट
------------------

--प्रकाशक : शंतनू देव
(THURSDAY, AUGUST 4, 2011)
-----------------------------------

               (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                           (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
              -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.09.2022-रविवार.