रुसवे..

Started by mkapale, September 28, 2022, 06:09:58 PM

Previous topic - Next topic

mkapale

तू जेव्हा वळून झटकन
निघून जातेस...सर पडून जाते जशी
वाट बघतो मी कि येशील
जाब विचारायला जशी गेलीस तशी

मग तू बोलतेस केवळ मोजकेच
सरीचा त्या दर्प राहतो तुज्या वागण्यात
मी शोधत राहतो उत्तर प्रश्न माहित नसतांना
खोचक तर नव्हतं काही...माझ्या बोलण्यात

मी शांत आणि तुही शांत काही दिवस
वाट पाहत कि पुढचा डाव कोण खेळतोय
बोलणं सुरु होतं छोट्याश्या एका गोष्टीनं
विसरून जातो कि अरे..आपण तर भांडतोय

तुला वाटते मी मनवावं आणि मला कि तू बोलावं
कारणं वेगळी उपाय वेगळे तरीही ते होतात
असे अनेक रुसवे जगत वर्ष उलटतात
ते जातात आणि खट्याळ आठवणी उरतात...केवळ आठवणी उरतात

Rohan Rajendra Bhosale

खूप छान कविता 👌👌. माझे "प्रेम काव्य" हे यूट्यूब चॅनल आहे. त्या वर मी माझे आणि इतर कवींचे कविता सादर करतो. तुमची हरकत नसेल तर तुम्ही तुमची कविता देणार का सादरीकरणासाठी? तुमच्या नावासहित प्रदर्शित होईल.

mkapale

Nakki dya...mala WhatsApp war contact karu shakata...8390405800 , Milind