एकटी…

Started by Vkulkarni, July 29, 2010, 02:51:12 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni


नेहमीच तुला
तशी मी विसरले
विसरताना सदैव
तुलाच स्मरले...

राखुन अंतर
नेहमीच बसले
गालात हलके
एकटीच हसले...

ओलेती पहाट
मनी भुप रंगला
तरी मी सदैव
भैरवीत दंगले...

पट मेघांचे
वसंत फ़ुलला
मी शरदाच्या
स्मृतीत झुरले..!

विशाल.
[/color]

Bahuli


Vkulkarni

धन्स नुतनजी !

gaurig


Vkulkarni

मन:पूर्वक आभार गौरी  :D

sanika


Vkulkarni

धन्स सानिका  :)

sanjana


Vkulkarni