२८-सप्टेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, September 28, 2022, 08:47:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२८.०९.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "२८-सप्टेंबर-दिनविशेष"
                                   ---------------------

-: दिनविशेष :-
२८ सप्टेंबर
जागतिक हृदय दिन
जागतिक कर्णबधिर दिन
Green Consumer Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
विजय तेंडुलकर
विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना 'विष्णूदास भावे गौरव पुरस्कार' जाहीर
१९९९
महाराष्ट्र सरकारचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर
१९६०
माली आणि सेनेगलचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
१९५०
इंडोनेशियाचा ध्वज
इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
१९३९
दुसरे महायुद्ध – वॉर्सॉने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९२८
सर अलेक्झांडर फ्लेमिंग
सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे 'पेनिसिलीन' या प्रतिजैविकाचा शोध लागला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
   -----------------------------
१९८२
अभिनव बिंद्रा
'लेफ्टनंट कर्नल' (सन्माननीय) अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय, बिंजिंग ऑलिम्पिक (२००८) मध्ये त्याने १० मी. एअर रायफल शूटिंग मध्ये त्याने ही कामगिरी केली. अर्जुन पुरस्कार (२०००), मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (२००२), पद्मभूषण (२००९)
१९८२
रणबीर कपूर
२०१५ मधील छायाचित्र
रणबीर कपूर – अभिनेता
१९४७
शेख हसीना – बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान
१९४६
माजिद खान – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान
१९२९
लता मंगेशकर – 'नायटिंगेल ऑफ इंडिया', सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, संगीतकार (आनंदघन) व निर्माती, भारतरत्‍न (२००१), पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), लंडनच्या 'रॉयल अल्बर्ट हॉल' मध्ये कार्यक्रम सादर करणारी पहिली भारतीय
१९०९
पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते
(मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)
१९०७
शहीद भगत सिंग – क्रांतिकारक
(मृत्यू: २३ मार्च १९३१)
१८९८
शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार, हिंदू महासभेचे अध्यक्ष, देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला
(मृत्यू: ? ? ????)
१८०३
प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
(मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१६
मॅक्स वॉकर
मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू
(जन्म: १२ सप्टेंबर १९४८)
२०१२
ब्रजेश मिश्रा
२००१ मधील छायाचित्र
ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
(जन्म: २९ सप्टेंबर १९२८)
२०१२
माधव एस. शिंदे – प्रख्यात चित्रपट संकलक (शोले, सीता और गीता, शान, रझिया सुलतान, सोहनी महिवाल, सागर, चमत्कार), फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक विजेते (शोले - १९७५)
(जन्म: ? ? १९२९)
२००४
डॉ. मुल्कराज आनंद – लेखक
(जन्म: १२ डिसेंबर १९०५)
२०००
श्रीधरपंत दाते – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते
१९९२
मेजर ग. स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे
(जन्म: ? ? ????)
१९८९
फर्डिनांड मार्कोस
फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (१९६५ - १९८६)
(जन्म: ११ सप्टेंबर १९१७)
१९५६
विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक
(जन्म: १ आक्टोबर १८८१)
१९५३
एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
(जन्म: २० नोव्हेंबर १८८९)
१८९५
लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
(जन्म: २७ डिसेंबर १८२२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.09.2022-बुधवार.