कविता पावसाच्या-कविता-एकोणसत्तरावी-काल पाऊस पडून गेला

Started by Atul Kaviraje, September 28, 2022, 08:57:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "कविता पावसाच्या"
                                  कविता-एकोणसत्तरावी 
                                 --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     पावसावरच्या सुंदर कविता-paus kavita in marathi वाचायच्या असतील तर तुम्ही योग्य जागी आला आहात. इथे तुम्हाला नवीन सुंदर पाऊस कविता वाचायला मिळतील.--

                                "काल पाऊस पडून गेला"
                               -----------------------

काल पाऊस पडून गेला,
आणि तुझी आठवण सोडून गेला..
तुइया स्पर्शाची जाणीव करत,
तो थेंबांना ओंजळीत साठवून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण,
रात्रभर डोळ्यातून वाहून गेला..

अंगावर माइया ओघळणारा
तो थेंब मनाला स्पर्शून गेला..
भिजलेला तो क्षण आपला
माझ्या नसानसात भिनून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
मनात माझ्या रुतून गेला..

बघ तो ढग ही माझ्या सारखा
तुझ्या प्रेमात पडून गेला..
तुझ्या विरहामध्ये तो वेडा
संपूर्ण रात्र रडून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
मला आठवणींच्या लाटेत बुडवून गेला..

ओलीचिंब तुझी आठवण
पुन्हा जाणवून गेला..
विरहाचे धागे मनामध्ये
पुन्हा नव्याने बांधून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
वेड जीवाला लावून गेला..

तू दिलेल्या जखमांना,
तो पुन्हा एकदा कोरून गेला..
खपल्या काडत तो जखमांना
पुन्हा उकरून गेला..
पाऊस पडत होता बाहेर पण
खोल जखम मनाला देऊन गेला..

--राकेश शिंदे
------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी स्टेटस.कॉम)
               -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.09.2022-बुधवार.