अरुण दाते-जेव्हा तिची नि माझी

Started by Atul Kaviraje, October 02, 2022, 08:28:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री.अरुण दाते यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "जेव्हा तिची नि माझी"

                                  "जेव्हा तिची नि माझी"
                                 --------------------

जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन्‌ पालखी निघाली

केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली

नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली

============
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : अरुण दाते
============

--प्रकाशक : शंतनू देव
(TUESDAY, JUNE 28, 2011)
------------------------------

              (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                         (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
             -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2022-रविवार.