मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-77

Started by Atul Kaviraje, October 03, 2022, 08:43:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-77
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --चंद्रशेखर  गोखले  सरांनी  प्रेमाचा  समर्पक  असा  अर्थ  या  प्रेम-चारोळीतून  वाचकांना  दिला  आहे .ते  म्हणतात , त्यांच्या  चारोळीतील  प्रेमी  आपल्या  प्रेमिकेस  म्हणतोय , हे  प्रिये , तू  जेव्हा  जेव्हा  माझ्यासोबत  असतेस , जेव्हा  जेव्हा  तू  माझ्या  जवळ  असतेस , तेव्हा  तेव्हा  तुला  फक्त  पाहणंच  होतं . तुला  फक्त  आणि  फक्त  बघावसच  वाटत . तुझे  सौंदर्य  दूर  जाऊ  नये , ते  जवळच  राहावे  असं  सतत  वाटतं  राहतं . तुझ्या  रूपाचे  मुक्त-गान  गाता  गाता  वेळ  कसा  निघून  जातो  ते  मला  कळतंच  नाही . पण  मला  आतासे  एक  नवीनच  असे  आकलन  होत  आहे . तू  माझ्या  बरोबर  असेपर्यंत  सर्व  ठीक  आहे . परंतु  तू  जेव्हा  माझ्यासोबत  नसतेस , तुझा  सहवास  जेव्हा  मला  लाभत  नाही , तेव्हा  तुझ्या  असण्याचा  आणि  नसण्याचा  खरा  अर्थ  मला  कळून  येतो . तू  जवळ  नसताना  जी  तुझी  ओढ  मला  लागून  जाते , तुझ्या  सहवासाच्या  आठवणी  ज्या  मला  येऊन  येऊन  राहतात , तेव्हाच   मला  तुझं   खरं  अस्तित्त्व  जाणवू  लागतं , तेव्हाचे  तुझ्यासोबत  माझं  जगणं  हे  खरं  जगणं  असतं . तुझा  दुरावाचं  तुझ्यावरचं  खरं  प्रेम  मला  दाखवून  देतो .

============
तु समोर असलीस की
नुसतच तुला बघण होत
आणि तू जवळ नसतांना
तुझ्या सोबत जगण होत
============

--चंद्रशेखर गोखले
----------------
--संकलक-पियुष तायडे
(Monday, February 01, 2016 )
----------------------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
            ------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.10.2022-सोमवार.