०४-ऑक्टोबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, October 04, 2022, 08:58:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.१०.२०२२-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                  "०४-ऑक्टोबर-दिनविशेष"
                                 ------------------------

-: दिनविशेष :-
०४ ऑक्टोबर
राष्ट्रीय एकात्मता दिवस
जागतिक प्राणी दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९८३
नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
१९५७
सोविएत रशियाने 'स्पुटनिक-१' हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
१९५९
सोविएत रशियाच्या 'ल्युनिक-३' या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.
१९४३
दुसरे महायुद्ध – अमेरिकेने प्रशांत महासागरातील सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
१९४०
दुसरे महायुद्ध – 'ब्रेनर पास' येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.
१९२७
माऊंट रशमोअर
हवाई छायाचित्र
गस्टन बोरग्लम याने 'माऊंट रशमोअर' चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली. ३१ ऑक्टोबर १९४१ रोजी याचे काम पूर्ण झाले. अमेरिकेच्या साऊथ डाकोटा राज्यातील कीस्टोन परगण्यात ब्लॅक हिल्स या डोंगरावर हे शिल्प कोरले आहे. यात जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझव्हेल्ट आणि अब्राहम लिंकन (डावीकडून उजवीकडे) असे अमेरिकेचे चार राष्ट्राध्यक्ष साकारण्यात आलेले आहेत. सुरुवातीला हे शिल्पामध्ये अर्धपुतळे बनवण्याची योजना होती, परंतु निधीच्या कमतरतेमुळे ते मधेच थांबवण्यात आले. या भागातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी म्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता आणि तो चांगलाच यशस्वी झाला.
१८२४
मेक्सिकोचा ध्वज
मेक्सिकोचा ध्वज
मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३७
जॅकी कॉलिन्स
जॅकलिन जिल तथा जॅकी कॉलिन्स – इंग्लिश प्रणयकथा लेखिका व अभिनेत्री. त्यांनी एकूण ३२ कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच्या सर्व न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत होत्या.
(मृत्यू: १९ सप्टेंबर २०१५ - बेव्हरली हिल्स, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)
१९३५
अरुण सरनाईक
अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक
(मृत्यू: २१ जून १९८४)
१९२८
ऑल्विन टॉफलर
२००६ मधील छायाचित्र
ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार, भविष्यवेत्ता व लेखक
(मृत्यू: २७ जून २०१६)
१९१६
धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला
धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती. योजना आयोगाचे उपाध्यक्ष, सी. एम. आय. इ. (Centre for Monitoring Indian Economy) चे आयुक्त
(मृत्यू: ? ? ????)
१९१३
सरस्वतीबाई राणे
सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची कन्या. शास्त्रीय गायनाबरोबरच त्या ख्याल, ठुमरी, भजन व अभंगही गात असत.
(मृत्यू: १० आक्टोबर २००६ - मुंबई)
१८२२
रुदरफोर्ड हेस
रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (कार्यकाल: ४ मार्च १८७७ ते ४ मार्च १८८१)
(मृत्यू: १७ जानेवारी १८९३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९८९
पं. राम मराठे
रामचंद्र पुरुषोत्तम तथा पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट. महाराष्ट्र शासनाच्या 'संगीतभूषण' पुरस्काराने सन्मानित (१९६१)
(जन्म: २३ आक्टोबर १९२४)
१९८२
मॅक्स प्लँक
सोपानदेव चौधरी – कवी. 'काव्यकेतकी', 'अनुपमा', 'सोपानदेवी' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.
(जन्म: १६ आक्टोबर १९०७)
१९६६
अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक
(जन्म: १ डिसेंबर १९११)
१९४७
मॅक्स प्लँक
१९३३ मधील छायाचित्र
मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ
(जन्म: २३ एप्रिल १८५८)१९२१
संगीतसूर्य केशवराव भोसले
'संगीतसूर्य' केशवराव भोसले – 'संगीत सौभद्र' मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. 'हाच मुलाचा बाप', 'संन्याशाचा मुलगा' या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे 'सौभद्र', 'शारदा', 'राक्षसी महत्त्वाकांक्षा' इ. अनेक नाटके रंगभूमीवर आली.
(जन्म: ९ ऑगस्ट १८९०)
१८४७
प्रतापसिंह भोसले
महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले (मराठा साम्राज्याचे आठवे छत्रपती) यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले.
(जन्म: १८ जानेवारी १७९३ - अजिंक्यतारा, सातारा)
१६६९
रेंब्राँ
सेल्फ पोर्ट्रेट (१६५९)
रेंब्राँ – डच चित्रकार
(जन्म: १५ जुलै १६०६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.10.2022-मंगळवार.