कवि : अशोक पुंडे-कविता - बिननावांच्या बिनचेहऱ्याच्या

Started by Atul Kaviraje, October 04, 2022, 09:19:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, कवि : अशोक पुंडे यांच्या , संग्रह : कविता - बिननावांच्या बिनचेहऱ्याच्या, यातील काही कविता--

1.

कुठूनशी एक आठवण येते
घेऊन येते विचारांची वाळलेली पानं
चालताना प्रत्येक पानं देतंय हुंकार
वाढतंच जाते विचारांची आणि आठवणींची गुंतावळ
घट्ट बंद केलेत मनाचे दरवाजे
तरीही थोड्याशा फटीतून येतच राहतात त्या
सलणारी जखम उघडी करण्यासाठी ....

2.

आज पुंन्हा एकदा दिसलास तू
नजर चुकाउन पळायच्या प्रयन्तात होतास तू
खजील झालेला चेहरा तुझा
केविलवाणी नजर तुझी
तू होतास एक चुकलेला निर्णय
आयुष्याच्या एका वळणावर भेटलास तू,
स्वतःही चुकलास आणि मलाही चुकवलस ....

3.

आयुष्याच्या संध्याकाळी माझ्या
दिसली माझी आई एका कोपऱ्यात
ती सुद्धा जुनी झाली आता
दाट सावलीसारख असणं तिचं
डोक्यात फिरणारे थरथरणारे हात तिचे
डोळे बंद करताच येतो तिचा चेहरा समोर
ओलावतात डोळे पुंन्हा पुंन्हा आठवणीने तिच्या ....

=====================
कवि : अशोक पुंडे
संग्रह : कविता-बिननावांच्या बिनचेहऱ्याच्या
=====================

--प्रकाशक : शंतनू देव
(FRIDAY, JULY 1, 2011)
--------------------------

                (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                           (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
               -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----04.10.2022-मंगळवार.