पुन्हा एकदा.......तुझीच आठवण

Started by pankh09, August 01, 2010, 08:26:55 AM

Previous topic - Next topic

pankh09


रोज संध्याकाळी त्याच पाऊलवाटेवरून
आता एकटाच चालत जाताना....
समोर असतं लालबूंद आकाश..
हवेत लहरणारी सोनेरी धुळ...
पानांवर जमलेले दवांचे मोती..
घरट्याकडे परतणारे छोटे छोटे पक्षी..
हळुवार उमटणारी ती चांदण्यांची नक्षी...
कुठेतरी चहाच्या टपरीवर वाजणार किशोरच गाणं
"घुंगरू की तरह..... "
रोजचचं होता हे सगळं..
तुझ्या आठवाणींच्या आगमनाचं बिगुल ....
पण आज....
पण आज नव्हती दिसत ती कुठेचं...

मग अचानक एखाद्या वळणानंतर
तिचं अवचित समोर येणं....

फारच वेडी आहे बघ ती...
अगदी तुझ्यासारखीचं...

कधी चार पाऊल सोबत चालते...
अन कधी उगाच पुढे पळत राहते...
तर कधी येते दबकत मागुन माझ्या...
रोज मला ही अशीच छळते....

तिचा अन माझा हा लपंडाव
आता रोजचाच झाला आहे...
तुझ्या आठवाणींनी माझ्या घरात
अगदी उच्छाद मांडला आहे...

पण म्हणतात ना...
"तुझं नि माझं जमेना...
अन तुझ्याविना तर करमेना..."
अगदी तसचं झालं आहे बघ...
माझं आणि तुझ्या आठवाणींचं...

असली की जीव अगदी नकोसा करून टाकते...
आणि नसली....
आणि नसली की मलाच जीव नकोसा होतो...


-पंकज सोनवणे
स्वरचित.....

santoshi.world

chhan ahe ............ hya oli khup avadlya  :)
पण म्हणतात ना...
"तुझं नि माझं जमेना...
अन तुझ्याविना तर करमेना..."
अगदी तसचं झालं आहे बघ...
माझं आणि तुझ्या आठवाणींचं...

असली की जीव अगदी नकोसा करून टाकते...
आणि नसली....
आणि नसली की मलाच जीव नकोसा होतो...