मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-82

Started by Atul Kaviraje, October 08, 2022, 10:00:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-82
                              -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --आपल्या  प्रेयसीच्या  आठवणींत  बुडून  गेलेला  हा  प्रियकर , त्याच्या  मनात  प्रियेच्या  आठवणींचे  काहूर  दाटले  आहे , माजले  आहे  ते  कसे  हे  चंद्रशेखर  सर  त्यांच्या  या  चारोळीतून  आपणास  सांगत  आहेत . ते  म्हणतात , त्यांच्या  चारोळीतील  प्रियकर  म्हणतोय , हे  प्रिये , तू  जेव्हा  जेव्हा  माझ्या  सोबत  नसतेस , माझ्या  बरोबर  नसतेस , तेव्हा  तेव्हा  या  तुझ्या  आठवणीच  तर  माझ्याभोवती  फेर   धरतात . त्या  अश्या  अलगद , अगदी  पावले  न  वाजवता  अश्या  काही  माझ्या  पावलांवर  पाऊल  ठेवून  येतात , की  मला  त्या  कधी  कळतंच  नाहीत . फक्त  त्यांचा  आवाज , भासमान  अस्तित्त्व  मला  जाणवत  रहात . असं  वाटतं  की  तूच  आली  आहेस , तूच  माझ्यासवे , माझ्या  सोबतीस  आहेस . आणि  माझं  मन  मला  समजावत  रहात , की  खरोखरच  ती  आहे , तीच  अस्तित्त्व  आहे , ती  नसली  तरी   तिचा  हा  भास , आभास  आहे . आणि  मग  याच  अलगद , चोर-पावलाने  आलेल्या  तुझ्या  आठवणी , मनात  घर  करून  राहतात . माझ्या  मनाला , अंतर-मनाला  त्या  तुझ्या  अस्तित्त्वाशी  जोडू  पाहतात . माझ्या  मनाला  हलकेच  त्या  स्पर्शून  जातात , मनाला  पावले  जोडून  जातात , आणि  मग  माझं  मन  तुझ्या  त्या  आठवणींचा  माग , पाठ-पुरावा , मागोवा  घेत  तुझं  असणं ,  तुझं  अस्तित्त्व  निरखू  लागतं , शोधू  लागतं .

==============
खूपदा तुझ्या आठवणी
पावलं न वाजवता येतात
आणि जाताना माझ्या मनाला
पावलं जोडून जातात
==============

--चंद्रशेखर गोखले
----------------
--संकलक-पियुष तायडे
(Monday, November 30, 2015)
-----------------------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
            ------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.10.2022-शनिवार.