१०-ऑक्टोबर-दिनविशेष-अ

Started by Atul Kaviraje, October 10, 2022, 08:47:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.१०.२०२२-सोमवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "१०-ऑक्टोबर-दिनविशेष"-अ
                                --------------------------

-: दिनविशेष :-
१० ऑक्टोबर
जागतिक मानसिक आरोग्य दिन
जागतिक मृत्यूदंड निषेध दिन
राष्ट्रीय टपाल दिवस
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९८
आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७५
पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९६४
जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९६०
विद्याधर गोखले यांच्या 'सुवर्णतुला' या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९५४
श्यामची आई चित्रपटाचे पोस्टर
आचार्य अत्रे निर्मित 'श्यामची आई' चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.
१९४४
दुसरे महायुद्ध – ८०० जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.
१९४२
सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०११
जगजीतसिंग
जगजीतसिंग – गझलगायक
(जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)
२००८
रोहिणी भाटे
रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका
(जन्म: १४ नोव्हेंबर १९२४ - पाटणा, बिहार)
२००६
सरस्वतीबाई राणे
सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची कन्या. शास्त्रीय गायनाबरोबरच त्या ख्याल, ठुमरी, भजन व अभंगही गात असत.
(जन्म: ४ आक्टोबर १९१३ - मिरज)
२०००
सिरीमावो बंदरनायके
सिरीमावो बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे 'सिलोन' हे नाव बदलून 'श्रीलंका' केले. खाजगी शाळा, तेलकंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयीकरण केले.
(जन्म: १७ एप्रिल १९१६)
१९८३
सुलोचना
१९२० मधील छायाचित्र
रुबी मायर्स ऊर्फ 'सुलोचना' – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे टोपणनाव पडले, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या (१९७३)
(जन्म: ? ? १९०७ - पुणे)
१९६४
गुरू दत्त
मिस्टर अँड मिसेस ५५
वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ 'गुरू दत्त' – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांचे 'चौदहवी का चांद', 'कागज के फूल', 'सीआयडी', 'मिस्टर अँड मिसेस ५५', 'आरपार' आणि 'प्यासा' इ. चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या 'साहिब बिबी और गुलाम' या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले.
(जन्म: ९ जुलै १९२५ - पदुकोण, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
१८९८
मणिलाल नभुभाई द्विवेदी
मणिलाल नभुभाई द्विवेदी– गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते
(जन्म: २६ सप्टेंबर १८५८ - नाडियाद, गुजरात)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.10.2022-सोमवार.