मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-86

Started by Atul Kaviraje, October 12, 2022, 09:08:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-86
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --चंद्रशेखर  गोखले  सरांची  ही  काहीशी  मिश्किल  चारोळी , मनाला  गुदगुल्या  करून  जाते . या  त्यांच्या चारोळीतील प्रियकर  स्वभावाने  अगदी  साधा , सरळ  आहे . त्याचे  आपल्या  प्रियेशी   वागणे  अगदी  घनिष्ट , मित्रत्त्वाचे  अन  प्रेमीचेही  आहे . ती  एक  दिवस  दिसली  नाही  की  त्याचा  जीव  कासावीस  होतो , इतके  त्याचे  तिच्यावर  जीवापाड  प्रेम  आहे . जेव्हा  जेव्हा  ती  दोघे  भेटतात , आणि  नेहमीप्रमाणे  गप्पात  बुडून  जातात , आणि  जायची  वेळ  येताच , ती  जेव्हा  त्याला  सोडून  जाण्यास  निघते , तेव्हा  ती  आणि  दोन  पळ , घटका , काही  मिनिट  तरी  राहावी  असं  त्याला  सारखं  वाटत  असतं . पण  काय  करणार  जावं  तर  लागेलच . आणि  इथेच  त्याचा  साधा , सरळ  प्रामाणिक  स्वभाव  दिसून  येतो . निघता  निघता  जेव्हा  त्याची  प्रेयसी  त्याला  वळून  पहात  असते , तेव्हाच  तो  नेमकी  नजर  चोरतो , कारण  तोही  तिला  जाताना  तिच्या  पाठमोऱ्या  आकृतीकडे  दुःखित  अंतःकरणाने  पहात  असतो .तेव्हा  कुणी  पाहिलं  तर  त्याला  याची  दयाचं  येईल , असा  हा  प्रेमी  तिच्याकडे  अगदी  बावळ्या नजरेने  , खुळ्या  भावनेने , रडवेल्या  चेहऱ्याने  पहात  असतो , आणि  त्याला  सारखं  वाटून  राहतं , ती  पुन्हा  आपल्याला  भेटावयास  केव्हा  येईल  ? आणि  असा  विचार  करता , त्याचा  चेहरा  आणखीनच  बावळट , खुळचट  होतो .

=================
नेमकं तेंव्हाच वळून बघू नकोस
जेंव्हा मी तुझ्याकडे बघत असेन
मला वाटतं तेंव्हा मी...
अगदी खुळ्यासारखा दिसत असेन...
=================

--चंद्रशेखर गोखले
----------------
--संकलक-पियुष तायडे
(Thursday, October 22, 2015)
---------------------------------

             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
             -------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक- 12.10.2022-बुधवार.