आठवणीतला पाऊस

Started by धनराज होवाळ, October 15, 2022, 07:54:38 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


☔ आठवणीतला पाऊस ☔

आठवतो का तो पाऊस,
दोघेही चिंब भिजलो होतो..
छत्री असून देखील आपण,
त्या पावसात सजलो होतो..!!

मेघगर्जनेचा पाऊस तो,
मुसळधार बरसत होता..
आपल्या हृदयातला पक्षी,
मिठीसाठी तरसत होता..!!

पावसात चालता चालता,
अचानक विज कडाडली..
तशी तु घाबरुन लाजून,
माझ्या मिठीत धडाडली...!!

हृदयाचे ठोके इतके वाढले की,
त्यापूढे कडकडाट मंद झाला..
तुझ्या मिठीत कळलंच नाही,
तो पाऊस कधी संथ झाला..!!

तुझ्या गालावरील ओघाळणाऱ्या थेंबांना,
मी ओठांनी मग हळूच स्पर्श केला..
एवढी घाबरलेली असताना सुद्धा,
सखे तेव्हा तु किती गोड हर्ष केला..!!

सखे तुझ्या डोळ्यांत ना तेव्हा,
खरंच एक वेगळीच चमक होती..
अन् माझ्यासाठी तो क्षण म्हणजे,
जग जिंकण्याची धमक होती..!!

पाऊस शांत झाल्यावर पाऊले,
आपल्या घराकडे निघाली होती...
पण आपली हृदय मात्र एकमेंकांत,
तेव्हा चिंब न्हाऊन निघाली होती...!!!
-
🤴🏻 प्रेमवेडा राजकुमार 🤴🏻
( ©धनराज होवाळ )
मो. ९९७०६७९९४९.