मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-89

Started by Atul Kaviraje, October 15, 2022, 10:10:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-89
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --चंद्रशेखर  गोखले  सरांनी  या  प्रेम-चारोळीतून  प्रेम-फुलबाजांची अतिशय  समर्पक  आणि  उजळणारी आणि प्रकाशमान  अशी  आतिषबाजी  केली  आहे . त्यांच्या  चारोळीतील  प्रियकर  आणि  प्रेयसी  दोघेही  एकमेकांना  भेटतात . त्यांच्यात  प्रेमाच्या  आणा-भाका , शपथा  होतात . त्यांचे  प्रेम  असंच  फुलत-झुलत  राहत . पण  जेव्हा  ती  दोघे  एकमेकांपासून  दुरावतात , जाण्यासाठी   एकमेकांचा  निरोप  घेताना , तेव्हाची  त्यांच्या  मनाची  दोलायमान  अवस्था , मनाची  हुरहूर , तळमळ , तगमग  ही काहीतरी  सांगून  जाते .त्यांना  अजून  खूप  बोलायचं  असतं . एकमेकांना  खूप  सांगायचं  असतं . पण    ते  अपूर्णच  राहत . शेवटी  निघता  निघता  अबोल  असे  त्यांचे  ओठ  काहीतरी  सांगून  जातात . आणि  डोळे  या  ओठांचे  काम  करतात . त्या  दोघांच्याही  डोळ्यांतून  ते  निःशब्द  प्रेम  व्यक्त  होत  राहत . काहीतरी  बोलायचे  होते  हेच  तर  ते  नयन  सांगून  जातात . काही  राहिलंय  हेही  ते  डोळेच  सुचवितात . आणि  मग  उद्या  पुन्हा  यायचा , भेटायचंI  वायदाही  ते  डोळेच  करतात .

==================
काही राहून जावं निघताना
तसं तुझ्या डोळ्यात दिसतं बघताना ...
==================

--चंद्रशेखर गोखले
----------------
--संकलक-पियुष तायडे
(Thursday, September 24, 2015)
-------------------------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
            ------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.10.2022-शनिवार.