१६-ऑक्टोबर-दिनविशेष-ब

Started by Atul Kaviraje, October 16, 2022, 09:55:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१६.१०.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                "१६-ऑक्टोबर-दिनविशेष"
                               ------------------------

ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
२००३
कृत्तिका – नेपाळची राजकन्या
१९५९
अजय सरपोतदार
अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
(मृत्यू: ३ जून २०१०)
१९४८
हेमा मालिनी
'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी चक्रवर्ती अय्यंगार ऊर्फ आयेशा बी – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक, राज्यसभा सदस्य (२००३ ते २००९), लोकसभा खासदार (मथुरा), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) कार्याध्यक्षा (2006). 'इधु साथियाम' (१९६३) या तामिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सपनोंका सौदागर (१९६८) हा मोठी भूमिका असलेला त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होय. त्यानंतर जॉनी मेरा नाम, अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले, सीता और गीता अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. १९८० च्या दशकातील त्या सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत.
१९०७
सोपानदेव चौधरी
सोपानदेव चौधरी – कवी. 'काव्यकेतकी', 'अनुपमा', 'सोपानदेवी' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.
(मृत्यू: ४ आक्टोबर १९८२)
१८९६
सेठ गोविंद दास
सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या लोकसभेतील खासदार (जबलपूर), पद्मभूषण (१९६१)
(मृत्यू: १८ जून १९७४)
१८९०
समतानंद
अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ. 'मौज' आणि 'निर्भिड' ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला.
(मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)
१८५४
ऑस्कर वाईल्ड
ऑस्कर वाईल्ड – आयरिश कवी व नाटककार, 'कलेसाठी कला' या मताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांच्या नाटकांची मराठीतही रुपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत 'दूरचे दिवे' हे नाटक 'अ‍ॅन आयडियल हजबंड'चे रुपांतर आहे. १९६३ मध्ये त्यांचे साहित्य 'द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड' या नावाने संकलित झाले आहे.
(मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००)
१८४१
इटो हिरोबुमी
१९०९ मधील छायाचित्र
इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान
(मृत्यू: २६ आक्टोबर १९०९)
१६७०
बंदा सिंग बहादूर
बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती
(मृत्यू: ९ जून १७१६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.10.2022-रविवार.