जवळचा मित्र ...

Started by Vkulkarni, August 02, 2010, 06:07:35 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

त्याची आणि माझी ...
दोस्ती तशी खुप पुरातन..
त्याचा अन माझा...
संवाद तसा जुनाच आहे
संवाद तरी कसे म्हणायचे
बर्‍याचदा फक्त तोच बोलतो
नाही म्हणायला शंका असतात माझ्या,
परवाच विचारले त्याला
हा कॅनव्हास बघितलास
पांढराशुभ्र ....., रंगवायचाय मला !
हंसला ....., हळुवारपणे म्हणाला
वेड्या ....! अरे आत्माच तो जणु
निर्लेप असतो .... निर्विकार
ना रंग ना रुप ना कसल्या अभिलाषा
त्या फलकाची चौकट आहे ना...
तो देह रे ! कुठलेतरी बंधन हवेच ना?
हा ... त्याला कुठले रंग द्यायचे
हे मात्र सर्वस्वी तुच ठरवायचस
तुझ्या मनातला अंधारही ...
सार्थपणे उमटेल बघ त्याच्यावर
पण त्या अंधारालाही
प्रकाशाची छटा द्यायला विसरू नकोस...
तुझ्या मनातला विषय ... वासना रेखाट हवे तर..!
पण त्यात मिसळ आठवणीने...
रंग माणुसकीचा आणि ....
सद् सद् विवेक बुद्धीचे अ‍ॅडिटीव्हही....
बंधने नको घालुस कुंचल्याला,
सुटू दे बेफ़ाम हवा तसा...
नेहेमीच भरकटणार्‍या मनासारखा...
सोड रे... कशाला हवा संयमाचा अहंकार....
मी आहे ना .... त्याचा लगाम आवळायला !
शेवटी मी तूझा जवळचा मित्र ना ...!

विशाल

Bahuli

@ Vishal....
Tumachi pratyek kavita...manala sparsh karun jate....
:)

gaurig

Apratim..........too good

तुझ्या मनातला अंधारही ...
सार्थपणे उमटेल बघ त्याच्यावर
पण त्या अंधारालाही
प्रकाशाची छटा द्यायला विसरू नकोस...
तुझ्या मनातला विषय ... वासना रेखाट हवे तर..!
पण त्यात मिसळ आठवणीने...
रंग माणुसकीचा आणि ....
सद् सद् विवेक बुद्धीचे अ‍ॅडिटीव्हही....


सोड रे... कशाला हवा संयमाचा अहंकार....
मी आहे ना .... त्याचा लगाम आवळायला !
शेवटी मी तूझा जवळचा मित्र ना ...!
khupach chan aahe hya lines.......... :) .......keep it up Vishal........

Vkulkarni

#3
नुतनजी, गौरीजी खुप खुप आभार !