संदीप खरे-कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ?

Started by Atul Kaviraje, October 16, 2022, 10:18:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री.संदीप खरे यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ?"

                       "कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ?"
                      -------------------------------------

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ?
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! .....

पावसाच्या धारा धारा ..... मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे .....
ओठभर हसे हसे..... उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे ?
आता जरा अळिमिळी
तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ! .....

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचूप ..... सुनसान दिवा !
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा !!
चांदण्याचे कोटी कण
आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ! .....

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर ..... काचभर तडा !
तूच तूच ..... तुझ्या तुझ्या ..... तुझी तुझी ..... तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा !! -
पडे माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना ! .....

आता नाही बोलायाचे ..... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ..... विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! .....

=========
गीत : संदीप खरे
संगीत :संदीप खरे
स्वर : संदीप खरे
=========

--प्रकाशक : शंतनू देव
(FRIDAY, SEPTEMBER 9, 2011)
----------------------------------

                (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                           (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
               -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.10.2022-रविवार.