मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-91

Started by Atul Kaviraje, October 17, 2022, 09:06:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-91
                             -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --ही  चारोळी  अश्या  प्रेमिकांना  समर्पित  आहे , ज्यांचे  एकमेकांवर  उत्कट , अत्त्युच्च  प्रेम  आहे , निरातिशय  प्रेम  आहे . त्या  दोघांनाही , म्हणजे  प्रियकर  आणि  त्याच्या  प्रेयसीला  माहित  आहे , की आपल्या  दोघांत  एक  असं  विशिष्ट  नातं  आहे , की  ज्याची  वाच्यता  दोघांनाही  करता  येत  नाही . आपल्या  दोघांनाही  ते  एकमेकांना  आजवर  कधीही  सांगता  आलेलं  नाही . खूप  काही  सांगायचं  असतं . मनात  भावनांची,  प्रेमाची  गुंफण  त्यात  होत  असते . शब्द  तर  तयार  होत  असतात . पण  ते  मात्र  ओठांवर  येईपर्यंत  आपसूकच  थांबतात . ओठांद्वारे  ते  कधीही  व्यक्त  होत  नाहीत . या  भावना  मग  मात्र  मनातच  राहून  जातात . तुलाही  ते  मला  सांगता  येत  नाही , आणि  मलाही  तुला  सांगायचा  संकोच  वाटतो . तर  असं  हे  आपलं  अशब्द ,अव्यक्त  असं  नातं  हे  फार  पलीकडे  जाऊन  पोचलेलं  आहे , आणि  ते  फक्त  तुला  आणि  मलाच  माहित  आहे .

====================
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघांनाही सांगता येत नIही ...
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्दं मात्र ओठांत येत नाहीत ...
====================

--संकलक-पियुष तायडे
--------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
            ------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.10.2022-सोमवार.