मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-4-माझी आई

Started by Atul Kaviraje, October 17, 2022, 09:22:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-4
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझी आई"

     जेव्हा मुलगा पहिल्यांदा बोलणे सुरू करतो तेव्हा त्याचा पहिला शब्द आई असतो. लहान मुलांसाठी आई ही सर्वकाही असते. आई शिवाय घर सुनेसुने वाटते. प्रत्येकाच्या जीवनात आईचे भरपूर महत्व असते, म्हणून मोठंमोठ्या लोकांनी आईच्या प्रेमाचा महिमा गायला आहे. जेव्हा आपण जन्माला येतो, मोठे होऊन चालायला लागतो, बोलणे सुरू करतो, शाळेत जायला लागतो या प्रत्येक ठिकाणी आई ही आपल्या सोबतच असते. आईला परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते. असे म्हणतात की देव प्रत्येकाजवळ राहू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवले. आपल्या संस्कृतीती आईला देवी समान पूजनीय मानले जाते. 

     आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या दुःखांना विसरून मुलांच्या सुखासाठी प्रयत्न करते. स्वतःच्या जेवणाआधी ती मुलांना अन्न भरवते. आई ही मुलांना कधीही भुखे झोपू देत नाही, रात्री जर मुलाला झोप येत नसेल तर आई अंगाई गीत गाऊन झोपवते. आई मुलांना राजा राणी व पऱ्यांच्या सुंदर गोष्टी सांगते. आई आपल्या मुलांकडे पाहून नेहमी खुश होते. मुलांना जर थोडे पण दुःख झाले तर ती विचलित होते. आपले सर्व दुःख व चिंताना विसरून ती मुलांचे दुःख आधी दूर करते. अशी ही प्रत्येकाची आई असते.

     आई शब्द ऐकून आपले मन प्रफुल्लित होते. म्हणून ज्या पद्धतीने आई आपली चिंता व देखभाल करते त्याच पद्धतीने आई व वडिलांच्या म्हातारपणात आपण देखील त्याची देखभाल करायला हवी.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.10.2022-सोमवार.