मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-5-माझे वडील-

Started by Atul Kaviraje, October 18, 2022, 09:22:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-5
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे वडील"

     वडील हे कौटुंबिक, सामाजिक आणि नैतिक जबाबदार्याना बजावतात. वडील जरी स्वतःला अधिकाधिक कठोर दाखवत असले तरी त्यांच्यापेक्षा दयाळू कोणीही नसते. एक वडीलच असतात जे स्वतःच्या हिताकडे लक्ष न देत कुटुंबाच्या आनंदासाठी प्रयत्न करतात. वडिलांपेक्षा संघर्षशील व्यक्ती कोणीही नसतो.

     माझ्या वडिलांचे नाव किसन आहे, ते एक शेतकरी आहेत. शेती करूनच ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात. माझे वडील अतिशय शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. ते माझ्या सर्व इच्छा व गरजांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. माझे वडील खूपच इमानदार व्यक्ती आहेत ते आपले कार्य कष्टाने करतात. माझे वडील दररोज आपला किमती वेळ काढून माझ्यासोबत घालवतात आणि दिवसभरच्या सर्व घटना व माझ्या समस्या मला विचारतात. त्यांनी आजपर्यंत मला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नाही. ते स्वतः खूप कष्ट सोसून आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.

     माझे वडील एक शिस्तप्रिय व्यक्ती आहेत ते स्वतः तर शिस्तीत जगतातच परंतु लोकांनाही शिस्त शिकवतात. त्यांचे दिवसभराचे कार्य ठरलेले असते व अतिशय शिस्तीने ते सर्व कार्य पूर्ण करतात. माझ्या वडिलांकडून मला शिस्तीचे महत्त्व कळाले आहे, त्यांनीच मला शिस्तीत राहण्याचे फायदे समजावले आहेत.

     माझे वडील वेळोवेळी कुटुंबासोबत बाहेर फिरायला नेतात महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी ते मला पिकनिक ला घेऊन जातात. मी त्यांच्या कडे कोणतीही इच्छा केल्यास ते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. ते माझ्यासाठी माझी शाळा व इतर नित्योपयोगी वस्तू अतिशय चांगल्या दर्जाच्या घेऊन देतात. ते मला कधीही सर्वांसमोर रागावत नाहीत. त्यांनी माझ्यावर कधी हातही उचललेला नाही. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ते संयमपूर्वक मला त्यांच्यासोबत बसून प्रेमाने समजावतात. मी सुद्धा वडील व सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. माझ्या शाळेचा अभ्यास व इतर कामे मी वेळेवर पूर्ण करतो.

     माझे वडील मला वेळोवेळी योग्य-अयोग्य समजावत असते व ते कायम प्रयत्न करतात की मला व आमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी व योग्य मार्गावर ठेवावे. मला या गोष्टीचा अभिमान आहे कि मी जगातील सर्वात चांगला वडिलांचा मुलगा आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.10.2022-मंगळवार.