अरुण दाते-भेट तुझी माझी स्मरते

Started by Atul Kaviraje, October 18, 2022, 09:26:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री.अरुण दाते यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "भेट तुझी माझी स्मरते"

                               "भेट तुझी माझी स्मरते"
                              ---------------------

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

============
गीत : मंगेश पाडगांवकर
गायक : अरुण दाते
संगीत : यशवंत देव
============

--प्रकाशक : शंतनू देव
(TUESDAY, JUNE 14, 2011)
------------------------------

                (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                            (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
               -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.10.2022-मंगळवार.