१९-ऑक्टोबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, October 19, 2022, 09:08:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.१०.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "१९-ऑक्टोबर-दिनविशेष"
                                ------------------------

-: दिनविशेष :-
१९ ऑक्टोबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००५
मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.
२०००
पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
१९९४
उस्ताद असद अली खाँ
रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा 'तानसेन पुरस्कार' जाहीर.
१९९३
पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर
१९७०
भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द
१९४४
दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.
१९३५
इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
१९२७
Pan AM Logo
पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीच्या कामकाजास सुरुवात झाली. १४ मार्च १९२७ रोजी या कंपनीची स्थापना झाली होती आणि ४ डिसेंबर १९९१ रोजी या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
१८१२
नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
१२१६
इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५६
सनी देओल
२०१२ मधील छायाचित्र
अजय सिंग देओल ऊर्फ 'सनी देओल' – बॉलीवूड कलाकार, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी, १७ व्या लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे खासदार (गुरुदासपूर, पंजाब)
१९५४
प्रिया तेंडुलकर
प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या. 'जन्मलेल्या प्रत्येकासाठी' या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
(मृत्यू: १९ सप्टेंबर २००२)
१९३६
शांताराम नांदगावकर
शांताराम नांदगावकर – गीतकार व कवी, विधानपरिषद सदस्य (शिवसेना - १९८५)
(मृत्यू: ११ जुलै २००९ - मुंबई)
१९२५
वा. द. वर्तक
डॉ. वामन दत्तात्रय तथा 'वा. द.' वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक
(मृत्यू: १७ एप्रिल २००१)
१९२०
पांडुरंगशास्त्री आठवले
पांडुरंग वैजनाथ तथा पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी 'स्वाध्याय परिवार' सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे 'मनुष्य गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.
(मृत्यू: २५ आक्टोबर २००३ - मुंबई)
१९१०
सुब्रमण्यम चंद्रशेखर
सुब्रमण्यम चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन खगोल वैज्ञानिक व गणिती. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील (Black Holes) संशोधनासाठी खर्च केला. यांचे काका सी. व्ही. रामन यांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९३०) मिळाले आहे. भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारे हे दोघेच भारतीय वंशाचे आहेत.
(मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५)
१९०२
दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक. 'किशोरीचे हृदय', 'विद्या आणि वारुणी' ही कादंबरी, 'तोड ही माळ' हे नाटक व अनेक कथासंग्रह त्यांनी लिहीले.
(मृत्यू: ३१ मे १९७३ - हैदराबाद, आंध्र प्रदेश)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९५
बेबी नाझ
बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग ऊर्फ 'बेबी नाझ' यांचे निधन.
(जन्म: २० ऑगस्ट १९४४)
१९५०
दादासाहेब केतकर
विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
(जन्म: ९ एप्रिल १८८७)
१९३७
अर्नेस्ट रुदरफोर्ड
अर्नेस्ट रुदरफोर्ड – न्यूझीलंडमध्ये जन्मलेले ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते (१९०८)
(जन्म: ३० ऑगस्ट १८७१)
१९३४
विश्वनाथ कार
विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून 'उत्कल साहित्य' नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.
(जन्म: २४ डिसेंबर १८६४)
१२१६
जॉन – इंग्लंडचा राजा
जॉन – इंग्लंडचा राजा
(जन्म: २४ डिसेंबर ११६६)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2022-बुधवार.