उषा मंगेशकर-छबीदार छबी मी तोऱ्यात उभी

Started by Atul Kaviraje, October 22, 2022, 10:33:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्रीमती उषा मंगेशकर यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे-  "छबीदार छबी मी तोऱ्यात उभी"

                            "छबीदार छबी मी तोऱ्यात उभी"
                           ----------------------------

अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं याला गरम शिणगार सोसंना
ह्याचा आधाशाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा
हितं शाहिरी लेखणी पोचंना
हितं वरण भाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
अरं सोंगा ढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी
अन्‌ सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन्‌ भायेर नळी रं, रं, रं

अशा गावात तमाशा बरा, इश्काचा जरा, पिचकारी भरा,
उडू दे रंग, उडू दे रंग, उडू दे रंग
मखमली पडद्याच्या आत, पुनवेची रात, चांदणी न्हात, होवू दे दंग
अगं चटक चांदणी, चतूर कामिनी
काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी
अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं

नवतीचं रान हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं
बांधावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी
अरं लाजमोड्या, भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं

डौल दावतो मोराचा, तिरपा डोळा चोराचा
वढ्याच्या काठाला आडिवतो, अंगावर पानी उडिवतो
अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं

मिरचीचा तोरा मी करते रं, वट्यात ऐवज भरते रं
पदर माझा धरतोस कसा, भवतीनं माझ्या फिरतोस कसा
अरं बत्त्ताशा, कशाला पिळतोस मिशा, हे वागणं बरं नव्हं

हिरवी शेतं दरवळली, टपोरी कणसं मोहरली
शिळ घालूनी करतोस खूणा, घडीघडी हा चावटपणा
अरं मर्दा, अब्रूचा होईल खुर्दा, हे वागणं बरं नव्हं

============
गीत :जगदीश खेबूडकर
संगीत : राम कदम
स्वर : उषा मंगेशकर
============

--प्रकाशक : शंतनू देव
(FRIDAY, JUNE 3, 2011)
---------------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                           (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
               ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.10.2022-शनिवार.