बाकी ते रुसणेच खरे......

Started by Vkulkarni, August 04, 2010, 03:28:36 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

तुझे ते लाजणे गालात
आठविता गं रात्र सरे

शब्द ओलावणे ओठात
स्मरण्यां दिवस ना पुरे

तु नसशी कवेत आता
बघ अशांत मन झुरे

बांध वेदनांचा तुटेना
शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे

मन विसरु पाही तुला
मज सुन्न एकांत सावरे

पुन्हा डोकावणे स्वप्नात
जखमांचे ते भान ना उरे

अन थांबलेले डोळ्यात
आसवांचे वाहते झरे

लटके ओशाळणे तुझे
बाकी ते रुसणेच खरे

विशाल

Anup N


Vkulkarni

धन्यवाद अनुप, खुप खुप आभार  :D

gaurig

Apratim........keep it up...........tumachya poem kharach khupach chan asatat......... :)

Vkulkarni

खुप खुप धन्यवाद गौरी  :D

amoul

mast mitra!! tuzi site pan aavadali!! (ajun vel kadhun vachen!!)

Vkulkarni

आभारी आहे अमोल. जरुर वाच आणि तिथेही प्रतिसाद द्यायला विसरू नकोस.  :)