मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-18-माझा आवडता छंद पुस्तके वाचन

Started by Atul Kaviraje, October 31, 2022, 10:10:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-18
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता छंद पुस्तके वाचन"

     माझा आवडता छंद: मित्रांनो छंद ही एक अशी गोष्ट असते जी व्यक्तीला आंनद मिळवून देते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण व्यस्त आहे. परंतु आयुष्याचा खरा आंनद अनुभवण्यासाठी एक छंद जोपासणे आवश्यक आहे.

     आजच्या या लेखात मी तुम्हाला maza avadta chand बद्दल सांगणार आहे. माझा आवडता छंद हा पुस्तके वाचण्याचा आहे. तर चला सुरू करूया..   

     आजच्या जगात ज्ञान हेच शक्ती आहे. म्हणून वाचनाचे महत्त्व देखील खुप आहे. मी वाचनाची आवड जोपासली आहे. वाचन हाच माझा छंद आहे. छंद म्हणजे अशी गोष्ट जी करायला आनंद वाटतो. छंद हा पैसे कमवण्यासाठी नाही तर थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. काही छंद खर्चिक असतात तर काही कमी खर्चात ही केले जातात. वाचन हा सर्वात कमी खर्चात जोपासला जाणारा छंद आहे.

     इंग्रजीत एक म्हण आहे "रीडींग मेक्स मैन परफेक्ट" याचा अर्थ होतो की वाचन व्यक्तीला योग्य बनवते. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात ते आपल्याला नैतिक सल्लाही देतात. परंतु जर आपली निवड चांगली नसेल तर वाचनाच्या पूर्ण आणि योग्य उपभोग आपण घेऊ शकत नाहीत. अयोग्य सामग्री असलेल्या पुस्तके मी वाचत नाही. महान लेखकांनी लिहिलेली पुस्तके माझ्या मेंदूला अधिक तीक्ष्ण बनवतात आणि विचार करायला ही चालना देतात.

     मला जवळपास सर्व विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात. आत्मचरित्र आणि तात्विक माहिती असलेली पुस्तके मला जास्त आकर्षित करतात. याशिवाय मला प्रवासा वरील पुस्तके वाचायला आवडतात, ते मला संपूर्ण जग फिरवतात. वाचनातून आनंद आणि ज्ञान दोघेही मिळतात. जे मला खूप साऱ्या ठिकाणी मार्ग दाखवतात. पुस्तकांनी मला नम्र बनवले आहे. त्यांनी मला वेगवेगळ्या लोकांना ओळखण्यात मदत केली आहे. यामुळे वाचन हा माझा छंद बनलेला आहे.

     महान लेखकांची पुस्तके मला ज्ञान देतात. जर मला एकदा वाचल्यावर पुस्तक समजले नाही तर मी ते पुन्हा पुन्हा वाचतो. महान लेखकांची पुस्तके आपल्या प्रतिभेला आव्हान देतात आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात. एका पद्धतीने ते आपल्या मेंदूला अन्न देतात. खरोखरच पुस्तके आपली प्रिय मित्र असतात. ज्या व्यक्तीच्या छंद पुस्तके वाचणे असतो तो कधीच एकटा नसतो.

     शेवटी निष्कर्ष एवढाच आहे की पुस्तके वाचन हा सर्वात चांगला छंद आहे. यात शंका नाही की पुस्तकांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे पण आपण पुस्तके लायब्ररीमधून सुद्धा वाचू शकतो. वाचन करायला दुसरे काहीही लागत नाही. वाचनाची ही आवड मी भविष्यातही जोपासत राहिल आणि तुम्हा सर्वांनाही माझा सल्ला आहे की तुम्हीही वाचनाचा छंद जोपासा.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.10.2022-सोमवार.